वॉशिंग्टन : जगातील महाशक्ती असलेल्या अमेरिकेचे सैन्य सर्वात शक्तिशाली आहे. दुसऱ्या स्थानी रशिया आणि तिसऱ्या स्थानी चीनचा क्रमांक आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणारा भारत या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ( worlds most powerful armies)
जागतिक संरक्षण माहितीचा मागोवा ठेवणाऱ्या ग्लोबल फायरपॉवर’ या संकेतस्थळाने जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य असलेल्या देशांची २०२४ची यादी जाहीर केली आहे. क्रमवारीसाठी १४५ देशांचे मूल्यांकन केले असून सर्वोत्तम सैन्याचा निवाडा करण्यासाठी अनेक निकष अभ्यासण्यात आले आहेत.
यामध्ये सैनिकांची संख्या, देशाच्या सैन्याकडे असलेली उपकरणे, आर्थिक स्थिरता आणि देशाचा अर्थसंकल्प, भौगोलिक स्थिती आणि उपलब्ध स्रोत आदी ६०पेक्षा अधिक घटक लक्षात घेतले आहेत. या घटकांच्या आधारे एकत्रित ‘पॉवरइंडेक्स’ गुणांक दिले जातात. या निर्देशांकानुसार गुणांक कमी असलेल्या देशांचे सैन्य ताकदवान समजण्यात आले आहे.
‘‘आम्ही ठरविलेल्या या सूत्रानुसार लहान आणि अधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांना मोठ्या, कमी विकसित शक्तींची स्पर्धा करण्याचा मार्ग दाखविला जातो. दरवर्षी ही यादी तयार केली जाते, ’’ असे ‘‘ग्लोबल फायरपॉवर’च्या वतीने सांगण्यात आले.
भारत
लष्करात ६५.७६ कोटींपेक्षा जास्त मनुष्यबळ
निमलष्करी दलात २५.२७ लाख राखीव दल, हवाई दलात ३.१०, पायदळात २१.९७ लाख आणि नौदलात १.४२ लाख मनुष्यबळ
एकूण ६०६ लढाऊ विमाने. त्यात १३० हल्ला करणारी लढाऊ विमाने, २६४ मालवाहू विमाने, ३५१ प्रशिक्षण विमाने, ७० विशेष मोहिमेसाठीची विमाने
एकूण ८६९ हेलिकॉप्टर व ४० लढाऊ हेलिकॉप्टर आहेत
पायदळाकडे चार हजार ६१४ रणगाडे, १.५१ लाखपेक्षा जास्त वाहने, १४९ स्वयंचलित तोफखाना
अमेरिका
अमेरिका जगातील पहिल्या दहा ताकदवान सैन्यांमध्ये पहिल्या स्थानावर
तांत्रिक प्रगती, वैद्यकीय क्षेत्र, हवाई क्षेत्र आणि संगणक/दूरसंचार क्षेत्रातही अमेरिका जागतिक पातळीवर आघाडीवर
यादीनुसार अमेरिकेकडे १३ हजार ३०० विमाने असून ९८३ लढाऊ हेलिकॉप्टर आहे.
सैन्यदलात १४. ९४ कोटींपेक्षा जास्त मनुष्यबळ
निमलष्करी दल अस्तित्वात नाही
हवाई दलात सात लाख, पायदळात १४ लाख तर नौदलात ६.६७ लाखांपेक्षा जास्त मनुष्यबळ
यादीतील शेवटचे दहा देश (क्रमनिहाय)
१४५) भूतान, १४४) मोलदोवा, १४३) सुरीनाम, १४२) सोमालिया, १४१) बेनिन, १४०) लायबेरिया, १३९) बेलिझ, १३८) सिरा लिओन, १३७) मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, १३६) आइसलँड
यादीतील पहिले दहा देश
१) अमेरिका, २) रशिया, ३) चीन, ४) भारत, ५) दक्षिण कोरिया, ६) ब्रिटन, ७) जपान, ८) तुर्किये, ९) पाकिस्तान, १०) इटली
संरक्षण दलासाठी तरतूद
(आकडेवारी डॉलरमध्ये)
८३१,७८१,०००,००० - अमेरिका
२२७,०००,०००,००० - चीन
१०९,०००,०००,००० - रशिया
७४,०००,०००,००० - भारत
७१,७२०,०००,०००- सौदी अरेबिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.