Narendra Modi : PM मोदींचा दबदबा कायम; बायडन, सुनकसारख्या नेत्यांना मागं टाकत पुन्हा बनले नंबर 1 नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत.
PM Modi News
PM Modi Newsesakal
Updated on
Summary

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत 10 व्या स्थानावर आहेत.

PM Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या (Morning Consult) वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या यादीत PM मोदी 78 टक्के जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत.

PM मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह 16 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागं सोडलंय. पंतप्रधान मोदींना जगभरातील नेत्यांमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळालंय.

PM Modi News
Adani Row : अदानींना आणखी एक झटका; माजी पंतप्रधानांच्या भावानं दिला कंपनीचा राजीनामा

या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (Mexico President Andres Manuel Lopez Obrador) दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 68 टक्के रेटिंग मिळालंय. तर, तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज आहेत, ज्यांचं रेटिंग 58 टक्के आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनीचं रेटिंग 52 टक्के आहे.

PM Modi News
Ajit Pawar : प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'बाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आम्ही एकत्र लढलो तर..

'मॉर्निंग कन्सल्ट'चं हे रेटिंग 26 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यानचं आहे. या यादीत ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा या यादीत 50 टक्के रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहेत. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची रेटिंग 40 टक्के आहे. त्यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं नाव येतं. त्यांची रेटिंग 40 टक्के आहे.

PM Modi News
'त्यांनी' आमचा विश्वासघात केलाय, सत्यजीत तांबेंबाबत हायकमांड लवकरच निर्णय घेईल - नाना पटोले

याशिवाय, भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत 10 व्या स्थानावर आहेत. जागतिक नेत्यांमध्ये त्यांचे रेटिंग 30 टक्के आहे. त्याचबरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या यादीत 11 व्या स्थानावर आहेत. त्याचे रेटिंग 29 टक्के आहे. सर्वेक्षणानुसार, 2021 नंतर पीएम मोदींची लोकप्रियता आणखी वाढली आहे. त्यामुळं ते अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.