Global News : भारताच्या भूमिकेमुळे दोन्ही देशांतील लाखो लोकांचे जीवन कठीण; जस्टीन ट्रुडो यांची टीका

कॅनडाने अधिकाऱ्यांना मायदेशी बोलाविले वाणिज्य कचेरीतील व्हिसा, सल्लागार सेवेला ‘ब्रेक’
Justin Trudeau
Justin Trudeausakal
Updated on

नवी दिल्ली- टोरांटो खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर भारत व कॅनडामध्ये निर्माण झालेला तणाव वाढत चालला आहे. कॅनडाने भारतातून राजनैतिक अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना माघारी बोलाविले असून चंडीगड, मुंबई व बंगळूर वाणिज्य कचेरीतील व्हिसा व सल्लागार सेवाही थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही सेवा केवळ दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयामध्ये उपलब्ध होऊ शकेल.

भारतातील ४१ राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या ४२ कुटुंबीयांना आम्ही भारतातून माघारी बोलावीत आहोत, असे कॅनडाचे परराष्ट्रमंत्री मेलानेई जोली यांनी जाहीर केले.

भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक पातळीवरील संबंधांमध्ये समानता हवी यासाठी आम्ही आग्रही होतो. भारताकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. जोली यांच्या निवेदनानंतर दिल्लीतील कॅनडाच्या दूतावासाने नागरिकांसाठीच्या निर्देशांमध्ये सुधारणा केली असून सध्या भारतात राहणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

Justin Trudeau
Global Leaders List:ग्लोबल लीडर्सच्या यादीत मोदींचा नंबर पहिला, बायडन-पुतिनलाही टाकलं मागे

आरोपानंतर परिस्थिती बिघडली

कॅनडाने भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलाविताना भारताकडून राजनैतिक संबंधांबाबतच्या व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी मध्यंतरी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर भारत संतापला होता. यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत कॅनडाला देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या घटविण्याचे निर्देश दिले होते.

Justin Trudeau
Global News : AI चे जनक हिंटन गुगलमधून पायउतार

भारत सरकारच्या भूमिकेमुळे दोन्ही देशांतील लाखो लोकांचे जीवन अत्यंत कठीण होऊन बसले आहे. यात राजनैतिक व्यवहाराच्या मूलभूत व्यवहारांचेच उल्लंघन करण्यात आले आहे. भारतीय उपखंडामध्ये स्वतःची पाळेमुळे शोधू पाहणाऱ्या लाखो कॅनडावासीयांवर याचा परिणाम होणार असल्याने मी चिंतेत आहे.

- जस्टीन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.