तिसरे महायुद्ध सुरु झाले तर कोणते देश राहतील सुरक्षित? जाणून घ्या

तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले तर कोणते देश सुरक्षित राहतील. तसेच कोणते देश सर्वाधिक सुरक्षित मानले जातात, याबाबत आपण जाणून घेऊयात.
global peace index 2023 safest countries in world list Third World War
global peace index 2023 safest countries in world list Third World War
Updated on

नवी दिल्ली- सध्या जग युद्धाच्या छायेत जगत आहे. कारण, जगातील दोन क्षेत्रांवर भीषण संघर्ष सुरु आहे. एका बाजुला रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरुंय, दुसरीकडे इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले तर कोणते देश सुरक्षित राहतील. तसेच कोणते देश सर्वाधिक सुरक्षित मानले जातात, याबाबत आपण जाणून घेऊयात.

सगळ्यात सुरक्षित देश कोणता?

ग्लोबल पीस इंडेक्स २०२३ च्या रँकिंगनुसार, तिसरे महायुद्ध सुरु झालं तरी काही देश अधिक सुरक्षित राहतील. या देशांमध्ये पहिला क्रमांक आईसलँडचा लागतो. तिसरे महायुद्ध सुरु झाले तर हा देश सुरक्षित राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे. आईसलँड हा गेल्या काही वर्षांपासून टॉपवर आहे.

global peace index 2023 safest countries in world list Third World War
China Pakistan Naval Exercise : चीनच्या युद्धनौका कराची बंदरात; पाकिस्तानसोबत मिळून करणार सर्वात मोठा युद्ध सराव

डेन्मार्क

तिसऱ्या महायुद्धात डेन्मार्क देखील सुरक्षित राहील. ग्रीनलँड देखील याच देशाच्या ताब्यात आहे. डेन्मार्क नाटोचा सदस्य आहे. अशावेळी ग्रिनलँड जगातील युद्धादरम्यान स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची शक्यता आहे.

आयर्लंड

इंग्लडच्या जवळ असणारा आयर्लंड देखील सुरक्षित राहू शकतो. हा देश नाटोचा सदस्य देश नाही. नाटोचा सदस्य आणि अमेरिकेचा सर्वात मोठा सोबती देश ब्रिटेन याला लागून आहे. अशा परिस्थितीत आयर्लंड सुरक्षित राहील.

global peace index 2023 safest countries in world list Third World War
जुन्नरमध्ये युद्ध पातळीवर शोध मोहीम

कॅनडा

कॅनडामध्ये यूरोपीय भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात. अमेरिकाचा हा शेजारी देश आहे. अशा परिस्थितीतही हा देश अमेरिकेवरील युद्धाच्या प्रभावापासून अलिप्त राहील

global peace index 2023 safest countries in world list Third World War
हमास-इस्राईल युद्ध, मुंबईत टेन्शन!

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया देखील तिसऱ्या महायुद्धापासून दूर राहण्याची शक्यता आहे. देशाच्या भौगोलिक स्थानामुळे येथे युद्ध होण्याची शक्यता कमी आहे.

ग्लोबल पीस इंडेक्स २०२३ नुसार, भारताचा या यादीमध्ये १२६ वा क्रमांक आहे. ग्लोबल पीस इंडेक्स देशांची रँकिंग ठरवत असताना विविध गोष्टी विचारात घेत असतो.देशाची लोकसंख्या, राजकीय स्थिरता, गुन्हेगारीचे प्रमाण, शिक्षण, भौगोलिक स्थान अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.