अंटार्क्टिकावर पोचले सूक्ष्म प्लॅस्टिक

बर्फ वेगाने वितळण्याचा धोका, जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम शक्य
global warming plastic pollution in Antarctica Risk of ice melting possible adverse effects on biodiversity
global warming plastic pollution in Antarctica Risk of ice melting possible adverse effects on biodiversitysakal
Updated on

मेलबर्न : जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिकावरील बर्फ वितळू लागला असून आता या हिमभूमीसमोर नवीन आव्हान उभे ठाकले आहे. संशोधकांना येथील भूमीत प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले असून ते तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान असल्याचे दिसून आले आहे. प्लॅस्टिकच्या कणांमुळे येथील बर्फ वितळण्याचा वेग आणखी वाढू शकतो अशी भीती वर्तविली जात आहे. ‘क्रायस्फेअर’ या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अंटार्क्टिकाला प्लॅस्टिकचा सर्वांत मोठा धोका असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

प्लॅस्टिकचा येथील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका असून वनस्पती आणि प्राण्यांची वाढ, प्रजोत्पादन आणि सर्वसामान्य जैविक प्रक्रियेवर देखील याचा नकारात्मक परिणाम होण्याचा धोका आहे. न्यूझीलंडच्या कॅंटरबरी विद्यापीठातील पीएचडी करणाऱ्या संशोधक अलेक्स ॲव्हस यांनी २०१९ मध्ये अंटार्क्टिकावरील ‘रॉस आइस शेल्फ’ या भागातून काही बर्फाचे नमुने गोळा केले होते. याच काळामध्ये येथील वातावरणामध्येही प्लॅस्टिकचा अंश मिसळला आहे का? त्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला होता. हे प्लॅस्टिक नेमके कोठपर्यंत पसरले आहे? याबाबत आताच अंदाज बांधता येणार नाही,असे सांगण्यात आले.

प्लॅस्टिकचा प्रकार पडताळून पाहणार

अंटार्क्टिकाच्या रॉस आयलंड भागातील १९ ठिकाणांवरून हे नमुने गोळा करण्यात आले होते, या सगळ्यामध्ये प्लॅस्टिकचे सुक्ष्मकण आढळून आले आहेत. वातावरणामध्ये मिसळलेल्या प्लॅस्टिकच्या सुक्ष्म कणांमुळे अंटार्क्टिकावरील बर्फाचे आवरण लवकर वितळण्याचा धोका आहे, असे संशोधकांनी सांगितले.

प्लॅस्टिकचे असेही प्रमाण

एक लिटर वितळलेल्या बर्फामध्ये सुक्ष्म प्लॅस्टिकचे २९ कण आढळून आले आहेत. रॉसचा समुद्र आणि अंटार्क्टिकाच्या इतर प्रदेशांशी तुलना करता हे प्रमाण खूपच अधिक असल्याचे दिसून येते. रॉस आयलंड, स्कॉट बेस आणि मॅकमुर्दो स्टेशन ही अंटार्क्टिकावरील सर्वांत मोठी ठाणी आहेत.

संशोधकांचा अंदाज चुकला

कँटरबरी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक लॉरा रेव्हेल म्हणाल्या की, ‘‘ अलेक्स जेव्हा २०१९ मध्ये अंटार्क्टिकावर गेली होती तेव्हा तिला तिथे प्लॅस्टिक सापडणार नाही असे आम्हाला वाटत होते. या दुर्गम भागामध्ये प्लॅस्टिक पोचले नसेल असा आमचा अंदाज होता पण तिने गोळा केलेले नमुने आम्ही पडताळून पाहिले असता काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण या अतिदुर्गम भागामध्येही पोचले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.