Sundar Pichai : ''कामावर फोकस करा, राजकारणावर नव्हे'' गुगलचे सीईओ सुंदर पिचाई कर्मचाऱ्यांवर भडकले

''ऑफिसमध्ये राजकारणावर चर्चा व्हायला नकोय. आपण एका कंपनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण कालावधीत काम करत आहोत. वास्तविक गुगल सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सेक्टरमध्ये कंपनी मागे पडत असताना दिसून येत आहे.''
Google Sundar Pichai
Google Sundar PichaiSakal
Updated on

Google Employees : गुगलच्या काही कर्मचाऱ्यांनी नुकतंच ऑफिसमध्ये धरणे आंदोलन केलं होतं. कर्मचाऱ्यांनी गगल क्लाऊडच्या सीईओच्या कार्यालयावर तब्बल आठ तास कब्जा केला होता. नंतर पोलिसांना पाचारण करुन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

या घटनेनंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई संतप्त झाले आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना इशार देत अशा प्रकारची वर्तणूक सहन केली जाणार नाही, असं म्हटलंय. कर्मचाऱ्यांचा फोकस कामावर पाहिजे, राजकारणावर नाही. काही लोकांच्या अशा वागण्यामुळे इतरांवरदेखील परिणाम होतो, असंही पिचाई म्हणाले.

Google Sundar Pichai
Fan Speed : उन्हाळ्यात तुमच्याही फॅनचा स्पीड कमी होतो का? जाणून घ्या कारण, अन् दुरूस्त करायची पद्धत

''ऑफिसमध्ये राजकारणावर चर्चा झाली नाही पाहिजे''

सुंदर पिचाई यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं की, कार्यालयाला वैयक्तिक गप्पांचा अड्डा बनवलं नाही पाहिजे. तुम्ही तुमचा फोकस कामावर ठेवून प्रॉडक्टवर बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण व्यवसाय करत आहोत, आपण आपल्या सहकाऱ्यांना असुरक्षिततेची जाणीव करुन दिली नाही पाहिजे.

सुंदर पिचाई यांनी इशारा दिला की, ऑफिसमध्ये राजकारणावर चर्चा व्हायला नकोय. आपण एका कंपनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण कालावधीत काम करत आहोत. वास्तविक गुगल सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सेक्टरमध्ये कंपनी मागे पडत असताना दिसून येत आहे.

दरम्यान, गुगलने आंदोलन करणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले आहे. शिवाय कंपनीच्या ९ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर गुगलने कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं की, अशा प्रकारची वर्तणूक सहन केली जाणार नाही. कंपनी या प्रकाराला गांभीर्याने घेत आहे. कंपनीचे इतर कर्मचारी चांगलं काम करत आहेत, परंतु काही लोकांचं वागणं चिंताजनक आहे. जर तुम्ही त्या कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी असाल तर तुम्हाला पुन्हा विचार करण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.