Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी
Updated on

Google Search Engine : जगभरातलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन गुगल ठप्प झालं आहे. अनेक देशांतून युजर्स त्याबद्दल सोशल मीडिया अकाऊंटवर लिहीत आहेत. अमेरिका आणि ब्रिटनच्या अनेक युजर्सनी यासंदर्भात एक्स अकाऊंटवरुन तक्रार केली आहे. गुगल साईट ओपन करतातच 502 Error असं दाखवत आहे.

जगभरातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या संबंधाने तक्रारींवर नजर ठेवणारी कंपनी डाऊन डिटेक्टरने यासंदर्भातला रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार, ब्रिटनमधून साधारण तिनशे युजर्सनी गुगल डाऊन झाल्यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यांना गुगलवर 'सर्च' करण्यामध्ये अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत आहे. काही लोकांनी गुगलच्या इतर सेवा डाऊन झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, डाऊन डिटेक्टरकडे अमेरिकेतून १४०० पेक्षा जास्त तक्रारी आल्याची माहिती आहे. अमेरिकेतल्या वेगवेगळ्या भाागतून या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये जास्त तक्रारी ह्या न्यूयॉर्क, डेनवर, कोलराडो, सीएटल या भागातून आलेल्या आहेत. विशेष म्हणजे गुगलचा जीमेल, युट्यूब आणि गुगल टॉक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मात्र शंभर युजर्सनी गुगल मॅप्सच्या संबंधाने तक्रारी केलेल्या आहेत.

लोकांनी गुगल डाऊनमुळे येणाऱ्या अडचणींबद्दल सोशल मीडियात पोस्ट केल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, गुगल डाऊन झालं आहे. त्याने एक फोटो शेअर केला त्यात एरर पेज दिसत आहे. यामध्ये एरर 502 दिसत आहे आणि 30 सेकंदानंतर ट्राय करा, असा मेसेज त्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.