Google Doodleद्वारे पहिल्या भारतीय महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचा सन्मान

Google Doodle: भारताच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या फातिमा शेख यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त (Birth Anniversary) गुगलने फातिमा शेख (Fatima Sheikh) यांचं डुडल बनवले आहे.
Google Doodle of Fatima Sheikh
Google Doodle of Fatima SheikhSakal
Updated on

Google Doodle of Fatima Sheikh: भारताच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या फातिमा शेख यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त (Birth Anniversary) गुगलने फातिमा शेख (Fatima Sheikh) यांचं डुडल बनवले आहे. 9 जानेवारी 1831 रोजी पुणे येथे फातिमा शेख यांचा जन्म झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त असलेल्या या गुगल डुडलमध्ये (Google Doodle) पांढऱ्या, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या या डुडलमध्ये दोन उघड्या पुस्तकांसह फातिमा शेख यांचं चित्र देण्यात आलंय. भारतातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका (First Female Muslim teacher) म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जाते.

भारताच्या समाजसुधारणा चळवळीत महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचं योगदान आपण सारेच जाणतो. महात्मा फुलेंनी वंचितांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचं काम केलं. 1948 साली त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. समाजाकडून होणारा सर्व त्रास सहन करत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या शाळेत मुलींना शिकवलं आणि देशातल्या पहिल्या महिला शिक्षक होण्याचा मान त्यांना मिळाला. या प्रवासामध्ये त्यांना साथ लाभली ती फातिमा शेख यांची.

Google Doodle of Fatima Sheikh
Google Doodle: गुगलचं हिवाळी संक्राती स्पेशल डुडल

सावित्रीबाई म्हणत की, माझ्या अनुपस्थितीत माझी सहकारी शाळेचं सगळं काम नीटपणे सांभाळेल, काहीही तोशीस पडू देणार नाही. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा समर्थपणे वाहणारी स्त्री म्हणजे फातिमा शेख. सावित्रीबाईंच्या या सहशिक्षिकेविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या कार्याबद्दल समग्रमपणे लिहिणाऱ्या लोकांकडेही फातिमा शेख यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

फातिमा शेख या उस्मान शेख यांची बहीण होत्या. असंही म्हटलं जातं की, मुलींची शाळा काढल्यानंतर जेव्हा महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. त्यावेळी उस्मान शेख यांनी त्यांना आश्रय दिला. त्याच उस्मान शेख यांच्या फातिमा शेख ही बहिण होती. 'सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय' या पुस्तकात एक फोटो आहे, ज्यामध्ये सावित्रीबाईंच्या शेजारी आणखी एक महिला बसली आहे. ही महिला म्हणजेच फातिमा शेख होय.

Google Doodle of Fatima Sheikh
Google Doodle: गुगल साजरा करत आहे 'पिझ्झा डे'

दलित, वंचित आणि स्त्रियांना शिक्षण दिलं म्हणून फुले दांपत्याला अनेक त्रास सहन करावे लागले. सावित्रीबाईंना तर अपमान, शिव्या, अंगावर शेण फेकणे अशा अनेक यातना सहन कराव्या लागल्या. साहजिकच या काळात सावित्रीबाईंसोबत सहशिक्षिका म्हणून काम करताना फातिमा शेख यांनाही अशाच प्रकारच्या त्रासाला तोंड द्यावं लागलं असेल.

सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेल्या एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंची तब्येत खराब असताना त्यांनी 10 ऑक्टोबर 1856 साली महात्मा फुलेंना एक पत्र लिहिलं होतं. त्या लिहितात, "माझी काळजी करू नका, तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन. फातिमाला सध्या त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही."

सावित्रीबाईंच्या अनुपस्थिती शाळेची जबाबदारी फातिमा यांनी समर्थपणे सांभाळली. फातिमा या सावित्रीबाईंच्या मैत्रीण आणि सहकारी होत्या. त्यांना स्वतःचं अस्तित्व होतं आणि सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने आपल्या डुडलद्वारे त्यांचा सन्मान केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.