Google Maps: ओला मॅपला गुगल मॅपची टक्कर ; स्मार्ट ट्रॅफिक अपडेट्स, लाईव्ह व्ह्यूव आणि बरचं काही

Ola Map & Google Map Competition: ओला मॅपशी स्पर्धा वाढत असल्याने गुगल मॅपने ग्राहकांसाठी अनेक नवीन सुविधा आणल्या आहेत.
Google Maps
Google Mapssakal
Updated on

नवी दिल्ली : ओला मॅपशी स्पर्धा वाढत असल्याने गुगल मॅपने ग्राहकांसाठी अनेक नवीन सुविधा आणल्या आहेत. यात इलेक्ट्रिक गाड्यांसाठी (इर्व्ही) चार्जिंग स्थानकांची माहिती, उड्डाणपुलांबाबतची माहिती आणि चार चाकी वाहन चालकांना अरुंद रस्त्यांऐवजी ‘एआयच्या’ सूचनेनुसार पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे. .

गुगल मॅपकडून सुविधांची घोषणा करताना मॅपिंग क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी हा उत्सुकतेचा क्षण आहे, असे म्हटले आहे. गुगलने एक ऑगस्टपासून गुगल मॅप वापरणाऱ्या अन्य ॲप डेव्हलपर्सच्या भाड्यात ७० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला.

आठवड्यापूर्वी ओलाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी भारतीय डेव्हलपर्सनी गुगल मॅपपासून अंतर राखावे, असे आवाहन करत अन्य ॲप डेव्हलपर्ससाठी ओला मॅप एक वर्षांसाठी मोफत वापरण्याची आकर्षक योजना जाहीर केली. ओला मॅपच्या रणनितीला शह देण्यासाठी गुगल मॅप्सने सहा सुविधांची घोषणा केली आहे.

Google Maps
Google Maps : फ्लायओव्हर घ्यायचा की सोडायचा? ते मेट्रोचं तिकीट; 'गुगल मॅप्स'ने भारतीयांसाठी लाँच 'हे' सहा भन्नाट फीचर्स

या सुविधा मिळणार

  •  चार चाकी गाड्यांसाठी अरुंद रस्त्यासंदर्भातील अचूक माहिती मिळणार

  •  लाईव्ह व्ह्यूव - ग्राहक त्यांच्या गाडीतील कॅमेऱ्याचा वापर करत नेविगेशन व दिशानिर्देश मिळणार

  •  स्मार्ट ट्रॅफिक अपडेट्स: एआयच्या मदतीने वाहतुकीची स्थिती जाणून घेत योग्य रस्त्याची निवड करता येणार

  •  इव्ही चार्जिंग स्थानक: गुगल मॅपकडून भारतातील ईव्ही चार्जिंगच्या स्थानकाची माहिती दिली जाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.