VIDEO - गूगल मॅपमुळे नवरदेवासह वरात पोहोचली चुकीच्या घरात

google maps
google maps
Updated on

जकार्ता - स्मार्टफोनच्या जमान्यात माणसांपेक्षा जास्त टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र हेच तंत्रज्ञान कधी कधी अडचणीतही टाकतं. आपण सहज फिरायला गेलो तरी गूगल मॅप्स टाकतो आणि कुठे काय आहे, रस्ता कसा, कुठून जाता येईल हे पाहतो. स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्समध्ये आपल्याला फक्त पत्ता टाकायचा असतो. बाकीची माहिती अॅप आपल्याला देतं. पण अॅपने दाखवलेला रस्ता आणि प्रत्यक्षात आपण जिथे असतो तिथून पुढे कुठं जायचं याबाबत थोडा गोंधळ होण्याची शक्यता असते. आता असाच एक प्रकार इंडोनेशियात घडला असून गुगल मॅपमुळे नवरदेव चुकीच्या ठिकाणी वरात घेऊन गेला. फक्त एवढंच नाही तर तिथं पाहुण्यांनीही आपलेच वऱ्हाड म्हणून आहेर देऊन स्वागतही केलं.

याबाबत इंडोनेशियातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एकाच गावात साखरपुडा आणि लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम सुरु होते. नवरदेवाला सेंट्रल जावा इथल्या पाकिस जिल्ह्यातील लोसारी हेमलेटमध्ये जायचं होतं. पत्त्यावर जाण्यासाठी नवरदेवाने गूगल मॅपचा वापर केला. मात्र जिथं जायचं होतं त्याऐवजी जेंगोल हेमलेटमध्ये सगळी वरात पोहोचली. हे ठिकाण लोसारी हेमलेटपासून जास्त दूर नाही. 

बरं नवरदेवासह वरात चुकीच्या रस्त्याने गेली तरी त्यांना जराही आपण वाट चुकलोय असं वाटलं नाही. वाटेत त्यांचं जोरदार स्वागतही झालं. त्याचवेळी वधुच्या घरच्यांशी बोलणं झालं तेव्हा आपण चुकीच्या मार्गाने आलो असल्याचं त्यांना समजलं. तिकडे वधू लग्नासाठी तयार होत होती आणि नवरदेव दुसऱ्याच मांडवात पोहोचला होता. आता या घडलेल्या संपूर्ण प्रकारातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नवरदेवासह इतर मंडळी हातात गिफ्ट घेऊन विचित्र अवस्थेत परतताना दिसले. 

घडलेल्या या सगळ्या प्रकारानंतर नवरदेवाच्या कुटुंबाने स्वागत करणाऱ्यांची माफी मागितली आणि पुन्हा जिथं जायचं होतं तिकडे पोहोचले. आता सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे नेटकरी असं विचारत आहेत की, नवरदेवाला कसं काय कळलं नाही की आपण चुकीच्या घरात आलोय? व्हिडिओमध्ये तर नवरदेवाकडची मंडळी या प्रकारावर हसत असलेली दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.