PM Modi in US : मोदींच्या अमेरिका दौऱ्याचं फलित! भारतात गुगल १० बिलियन, तर अमेझॉन १५ बिलियन डॉलर्सची करणार गुंतवणूक

पिचाई यांनी यावेळी डिजिटल इंडिया मोहिमेचं भरपूर कौतुक केलं.
Sundar Pichai Meets Modi
Sundar Pichai Meets ModieSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ ते २३ जून या दरम्यान अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, प्रथम महिला आणि कित्येक मोठ्या कंपन्यांच्या सीईओंशी भेट घेतली. यामध्ये गुगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचाई, आणि अमेझॉनचे सीईओ अँड्र्यू जेसी यांचाही समावेश होता.

मोदींशी भेट घेतल्यानंतर सुंदर यांनी एएनआयला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी सांगितलं, की पंतप्रधान मोदींना भेटणं ही सन्मानाची बाब होती. डिजिटल इंडिया (Digital India) मोहिमेबाबत पंतप्रधानांचा दृष्टीकोन हा काळाच्या पुढचा होता. हे एक असं ब्लूप्रिंट आहे, जे करण्याचा प्रयत्न इतर देश करत आहेत.

Sundar Pichai Meets Modi
PM मोदींचा US दौरा ठरला महत्वाचा, भारतात निर्माण होणार मोठा रोजगार! IT राज्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

गुगलचा मोठा निर्णय

डिजिटल इंडिया मोहिमेमुळे प्रभावित झालेल्या सुंदर यांनी यावेळी एक मोठी घोषणा केली. भारताच्या डिजिटायझेशनसाठी गुगल देशात १० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुढच्या दहा वर्षांचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ही गुंतवणूक करण्यात येणार आहे.

यामध्ये गुगल एक युनिफाईड एआय मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामध्ये १०० हून अधिक भारतीय भाषांचा (टेक्स्ट आणि स्पीच) समावेश असेल. गुगलच्या या प्रकल्पाला प्रोजेक्ट रिलेट असं नाव देण्यात आलं आहे.

गुजरातमध्ये फिनटेक सेंटर

सुंदर पिचाई यांनी यावेळी सांगितलं, की गुगल गुजरातमध्ये आपलं ग्लोबल फिनटेक (फायनॅन्शिअल टेक्नॉलॉजी) ऑपरेशन सेंटर उभारेल. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

अमेझॉनची १५ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक

दुसरीकडे अमेझॉनचे सीईओ जेसी यांनीदेखील आपण भारतात गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलंं आहे. "भारतात भरपूर रोजगार निर्माण करणे, लहान आणि मध्यम उद्योगांना डिजिटल करणे यासाठी आम्हाला मदत करायची आहे. तसंच, भारतातील उत्पादने जगभरात निर्यात करण्यासाठी देखील आम्ही मदत करू. आम्ही यापूर्वी भारतात ११ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भविष्यात आणखी १५ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा आमचा विचार आहे." असं जेसी म्हणाले.

Sundar Pichai Meets Modi
PM Modi in US : अमेरिकेतून प्रोजेक्ट आणला पण गुजरातला नेला; मायक्रॉनचा 2.7 अरब डॉलरचा प्लांट येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.