जगातील आर्थिक मंदीची भीती आता गुगललाही सतावू लागलीय.
Google Recruitment : जगातील आर्थिक मंदीची भीती आता गुगललाही सतावू लागलीय. Google ची मूळ कंपनी Alphabet Inc. नं आता वर्ष 2022 च्या उरलेल्या दिवसांसाठी भरती प्रक्रिया मंद करण्याचा निर्णय घेतलाय. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी मंगळवारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये या निर्णयाची माहिती दिलीय.
लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, सुंदर पिचाई यांनी एका ईमेलमध्ये म्हटलंय की, 2022 आणि 2023 मध्ये कंपनीचं लक्ष केवळ अभियांत्रिकी, तांत्रिक तज्ञ आणि महत्त्वाच्या पदांवर कर्मचारी भरती करण्यावर आहे. 2022 च्या पहिल्या टप्प्यात कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या भरतीचा कोटा पूर्ण केलाय. त्यामुळं आता आपल्याला यशासाठी अधिक प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं पिचाई यांनी म्हटलंय.
पिचाई यांनी मेलमध्ये पुढं लिहिलंय, इतर कंपन्यांप्रमाणं आम्हीही आर्थिक संकटांपासून दूर नाहीय. म्हणून आम्ही जागतिक आर्थिक परिस्थितीकडं दुर्लक्ष करू शकत नाही. अशा आव्हानांना आपण नेहमीच अडथळे म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहायला हवं. आपण सध्याच्या परिस्थितीचं संधींमध्ये रूपांतर करू, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
पिचाई म्हणाले, '2022 आणि 2023 मध्ये कंपनीचं लक्ष अभियांत्रिकी, तांत्रिक आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये कर्मचारी भरती करण्यावर असेल. दुसऱ्या तिमाहीतच आम्ही 10,000 कर्मचारी गुगलमध्ये जोडले आहेत. तिसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा आमचा मानस आहे. मात्र, आम्ही यावर्षी भरतीचं लक्ष्य जवळपास पूर्ण केलंय, त्यामुळं या वर्षातील उर्वरित दिवस आम्ही भरती प्रक्रिया मंद करत आहोत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.