Greece Wildfires : ग्रीसमधील वणवे थांबण्याचं नाव घेईनात; आतापर्यंत ३० हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर

सोमवारी आणखी २,५०० लोकांना कोर्फू बेटावरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं.
Greece Wildfires
Greece WildfireseSakal
Updated on

सध्या अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आली आहे. यातच युरोपातील ग्रीस देशामध्ये मोठा वणवा पसरला आहे. याचा ग्रीसमधील रोड्स आणि कोर्फू या बेटांवर सगळ्यात जास्त परिणाम दिसून येतोय. कित्येक वर्ग किलोमीटर आग पसरल्यामुळे या दोन्ही बेटांवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

गेल्या आठवड्यापासून हे वणवे सुरूच आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही वणवा पसरतच चालला आहे. गेल्या आठवड्यापासून याठिकाणी असणाऱ्या ३० हजार लोकांना दुसरीकडे हलवण्यात आलं. यामध्ये स्थानिक आणि पर्यटकांचा समावेश आहे. सोमवारी (२४ जुलै) आणखी २,५०० लोकांना कोर्फू बेटावरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं.

Greece Wildfires
Seema Haider : सीमा पाठोपाठ आता भारतीय महिलाही मित्रासाठी थेट पाकिस्तानात! मुलांना सोडून गाठलं लाहोर

उष्णतेची लाट आहे कारण

तज्ज्ञांच्या मते ग्रीसमध्ये आतापर्यंत झालेल्या आगीच्या घटनांपैकी ही सगळ्यात मोठी आग आहे. नागरिकांना वाचवण्यासाठी राबवण्यात आलेलं अभियान हे आतापर्यंतचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

सर्वात प्रसिद्ध स्थळ

युरोपीय देश हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यातच ग्रीसमधील रोड्स हा बेट एक प्रमुख आकर्षण आहे. अल जजीराने दिलेल्या रिपोर्टनुसार, २०२२ मध्ये रोड्स बेटाला सुमारे २.५ दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली होती. आताही कित्येक हजार पर्यटक या बेटांवर उपस्थित होते, ज्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागलं.

Greece Wildfires
HC Judges Death Threat: "पाकिस्तानच्या बँकेत पैसे पाठवा अन्यथा...; हायकोर्टाच्या 6 न्यायाधिशांना जीवे मारण्याची धमकी

कित्येक उड्डाणं रद्द

या वणव्यांमुळे रोड्स बेटावर जाणारी कित्येक उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. तुई, जेट२ अशा विमान कंपन्यांनी या बेटांवर जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स कॅन्सल केल्या आहेत. मात्र, पर्यटकांना परत आणण्यासाठी रिकामी विमानं पाठवणं सुरू असल्याचं कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच, रेक्स्यू ऑपरेशनसाठी क्रोएशिया, फ्रान्स, स्लोव्हाकिया आणि तुर्कीये असे देशही मदत करत आहेत.

जगभरात वाढले वणवे

२०२३ वर्षामध्ये जगभरात कित्येक वणव्यांच्या घटना पहायला मिळाल्या आहेत. कॅनडा, अमेरिका, दक्षिण अमेरिका, कझाकिस्तान, ऑस्ट्रेलिया अशा कित्येक देशांमध्ये लागलेल्या आगीत लाखो एकर वनक्षेत्र नष्ट झालं आहे. या वणव्यांचं प्रमुख कारण हे हीटवेव्ह असल्याचं मानलं जात आहे.

Greece Wildfires
Bar Fire : बारमधून बाहेर काढलं म्हणून आला राग, तरुणाने थेट बिल्डिंगला लावली आग; ११ जणांचा बळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.