Lok Sabha Result: जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव! जो बायडेन, पुतिन, मेलोनी; नरेंद्र मोदींना कोणत्या जागतिक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा?

Global leaders wished Narendra Modi: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या नेत्यांनी पुन्हा सत्ता स्थापन करत असल्याबद्दल मोदींना शुभेच्छा दिल्या.
narendra modi
narendra modi
Updated on

Lok Sabha Elections Result 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय मिळाला आहे. नरेंद्र मोदी लवकरच शपथ घेण्याची शक्यता आहे. मोदींच्या तिसऱ्या टर्मसाठी जगभरातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या नेत्यांनी पुन्हा सत्ता स्थापन करत असल्याबद्दल मोदींना शुभेच्छा दिल्या.

बायडेन काय म्हणाले?

एक ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी, त्यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि ६५ कोटी मतदार यांना शुभेच्छा. दोन्ही देशातील अपार क्षमता पाहता भारत आणि अमेरिची दोस्ती कायम राहील, असं जो बायडेन यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

narendra modi
Lok Sabha Result Maharashtra: काँग्रेसचा सिक्सर अन् भाजप हिट विकेट; वाचा, लोकसभा निवडणुकीत कशी होती महाराष्ट्रातील पक्षांची कामगिरी

ब्रिटनचे पंतप्रधान काय म्हणाले?

नरेंद्र मोदी यांचा विजय झाल्यानंतर मी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये जवळची मैत्री आहे आणि ही मैत्री पुढेही वाढत राहील, असं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

रशियाचे सर्वेसर्वा काय म्हणाले?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी प्रेस रिलिज जारी करुन नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मला विश्वास आहे की भारत आणि रशियामधील मैत्रीचे संबंध पुढे जात राहतील. आम्ही भारतासोबत द्विपक्षीय आणी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करत राहू, असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांच्या या शुभेच्छांचा मोदींनी स्वीकार केला आहे. त्यांना धन्यवाद देताना मोदी म्हणालेत की, भारत आणि रशियामधील राजनैतिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

narendra modi
Loksabha Elections 2024 : 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे वडीलही होते निवडणुकीच्या शर्यतीत ! "हा खूप कठीण दिवस..." सोशल मीडियावर शेअर केल्या भावना

इतर काही नेत्यांच्या शुभेच्छा!

नरेंद्र मोदी यांना इतरही काही जागतिक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझू, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे या नेत्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींच्या तिसऱ्या टर्मसाठी जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.