US Election : 'कंट्रोल डोनाल्ड, कंट्रोल'; ग्रेटाने उडवली खिल्ली; ट्रम्प यांच्या स्टाईलनेच दिले सडेतोड उत्तर

greta thunberg
greta thunberg
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हाय व्होल्टेज निवडणुकीत आता डोनाल्ड ट्रम्प यांची हार स्पष्टपणे दिसून येत आहे. मीच जिंकणार आणि मी जिंकलो आहेच, असं म्हणत असताना मतमोजणीचे आकडे मात्र काही वेगळेच दाखवत आहेत. आपली हार मान्य नसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता या निवडणूक निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आणि आता त्यांच्या या पवित्र्यावर स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत थेट उत्तर दिलं आहे. त्यांचं हे उत्तर चांगलंच व्हायरल होत आहे.

ग्रेटाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, किती हास्यास्पद आहे हे... डोनाल्ड यांनी आपल्या रागाच्या समस्येवर काम करण्याची गरज आहे. आणि त्यानंतर त्यांना आपल्या एखाद्या मित्रासोबत एखादी ओल्ड फॅशन्ड मुव्ही पाहण्यासाठी जायला हवं. थंड व्हा डोनाल्ड... थंड व्हा... असं म्हणत ग्रेटाने डोनाल्ड ट्रम्प यांचा टोला लगावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरुन मतमोजणी थाबवा असं ट्विट केलं होतं. त्यावर ग्रेटाने हे उत्तर देत त्यांची खिल्ली उडवली आहे. 

कंट्रोल डोनाल्ड, कंट्रोल...  ग्रेटाचे सडेतोड उत्तर
पर्यावरणातील हानीकारक बदलांविरोधात पोटतिडकीने मत मांडणारी ग्रेटा ही टाइम मॅगझीनच्या पर्सन ऑफ द इअरसाठी निवडली गेली  होती. तिच्या पर्यावरणविषयक चळवळीसाठी जगभरातून तिचे कौतुक आणि पाठींबा व्यक्त करण्यात आला होता. मात्र, जगातील सर्वांत ताकदवर मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ग्रेटाचा एकूण पवित्रा आवडला नव्हता आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी तर ग्रेटाला आपला राग ताब्यात ठेवण्याचा सल्लाही दिला होता. ट्रम्प यांनीही असंच ट्विट केलं होतं.... ज्यात त्यांनी म्हटलं होतं की... किती हास्यास्पद आहे हे... ग्रेटाने आपल्या रागाच्या समस्येवर काम करण्याची गरज आहे. आणि त्यानंतर तिने आपल्या एखाद्या मित्रासोबत एखादी ओल्ड फॅशन्ड मुव्ही पाहण्यासाठी जायला हवं. थंड हो ग्रेटा... थंड हो... 
त्यांच्या याच ट्विटचा एकप्रकारे सडेतोड बदला घेत ग्रेटाने संधी साधली आहे. ग्रेटा थनबर्ग डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ट्विट करताना नेहमी दिसते. निवडणुकीच्या मतदानाआधीही तिने पर्यावरणाच्या भल्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा जो बायडेन यांनाच मत द्या, असंही आवाहन केलं होतं. 

'फ्रायडेज फॉर फ्यूचर' नावाची केली चळवळ

ग्रेटा थरबर्ग सप्टेंबर 2019 मध्ये चर्चेत आली होती. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणीय बदलांसंदर्भातील एका संमेलनात तिने भाषण केलं होतं. जगातील सर्व शक्तिशाली नेते ग्रीन हाऊसमधील वायूंच्या उत्सर्जनास कमी करण्यात कसे कमी पडले आहेत, आणि त्यामुळे नव्या पीढीला ते कसे धोक्यात टाकत आहेत, याविषयीचे तिचे भाषण खुपच गाजलं होतं. आणि त्यानंतर ग्रेटा चर्चेत राहीली आहे. स्वीडनमध्ये राहणारी ग्रेटा ही अवघ्या 16 वर्षांची आहे. तिने पर्यावरणाच्या मुद्यावर आपल्या देशाच्या संसदेच्या बाहेर प्रदर्शन केलं होतं. तसेच तिने जगभरात एका चळवळीची सुरवात केली होती. 'फ्रायडेज फॉर फ्यूचर' नावाची एक चळवळ तीने सुरु केली होती. मात्र ग्रेटाने आता योग्यवेळी योग्य ठिकाणी ट्रम्प यांना दिलेला हा टोला सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.