ऐकावं ते नवलंच : सव्वा लाखाची छत्री पावसात मात्र निरुपयोगी
Gucci Adidas Umbrella
छत्री आपण पावसाळ्यात आणि या व्यतिरीक्त उन्हाळ्यात वापरतो. पण पाऊस म्हटलं की छत्री डोळ्यासमोर येते. आता पावसाळा जवळ येत असताना सध्या सोशल मीडियावर एका छत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या छत्रीची किंमत ५००-१००० नाही तर चक्क सव्वालाख आहे. पण धक्कादायक म्हणजे ही छत्री पावसात तुम्हाला कामी पडणार नाही. हो. अशी छत्री दोन प्रसिद्ध ब्रँड्सीनी बनवली. चीनमध्ये सध्या ही छत्री चर्चेचा विषय ठरलीय.
जगातील नामवंत ब्रँड Gucci आणि Adidas चीनमध्ये अशी छत्री बाजारात आणण्याच्या विचार करत आहे. या छत्रीची किंमत 11,000 युआन म्हणजे सुमारे एक लाख 27 हजार रुपये आहे. तर पावसापासून संरक्षण करण्याकरीता ही छत्री बनवली नसल्याचं कंपन्यांचं स्पष्ट मत आहे. ही छत्री फक्त उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आणि सजावटीच्या वापरासाठी आहे. Gucci नुसार, या सन अंब्रेलामध्ये इंटरलॉकिंग G आणि trefoil डिझाईन आहे. छत्रीचं हॅण्डल लाकडी आहे.
पुढील महिन्यात ही छत्री चीनच्या बाजारात आणली जाईल. सोशल मीडियावर या छत्रीवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. पावसापासून संरक्षण करू न शकणारी ही छत्री एवढी महाग का असा प्रश्न विचारला जात आहे
चीनची अर्थव्यवस्था मोठी आहे. याचे एकमेव कारण म्हणजे येथे अनेक मोठे ब्रँड्स आहेत. सोबतच इथे महागड्या वस्तुंना मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.