जगातला सर्वात वृद्ध कुत्री पेबल्सचं आज निधन झालं आहे. या कुत्रीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली होती. ही कुत्री बावीस वर्षांची होता. टॉय फॉक्स टेरियर जातीची ही कुत्री होती.
सोमवारी ३ तारखेला या कुत्रीला नैसर्गिक मृत्यू आला. साऊथ कॅरोलिनामधल्या टेलर्स इथं तिचा मृत्यू झाला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातला सर्वात वयोवृद्ध कुत्री म्हणून मे महिन्यात तिची नोंद झाली होती. या कुत्रीचे मालक बॉबी आणि ज्युली ग्रेगरी यांच्या लक्षात आलं की आपली कुत्री आपल्या आधीच्या कुत्र्यापेक्षा अधिक काळ जगली आहे. त्यांचा आधीचा कुत्रा २१ वर्षे जगला होता.
याबद्दल बोलताना ज्युली ग्रेगरींनी सांगितलं की, बॉबी सोफ्यावर आपला परिवार आणि मित्रांसोबत बसला होता. तेव्हा त्याने २१ वर्षीय कुत्र्याची गिनीज बुकात नोंद झाल्याची बातमी पाहिली. त्यानंतर त्यांनी आपल्या पेबल्सबद्दलही माहिती दिली. पेबल्सचा जन्म २८ मार्च २००० सालचा. त्याच वर्षी ग्रेगरींनी त्याला दत्तक घेतलं. त्याच्यासोबत रॉकीलाही दत्तक घेतलं होतं. रॉकी २०१६ साली वारला. पेबल्सने ३२ पिल्लांना जन्म दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.