पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी पहाटे बलुचिस्तानच्या नोश्कीजवळ बंदूकधाऱ्यांनी नऊ जणांची हत्या केली. बंदूकधाऱ्यांनी त्यांना बसमधून उतरवून त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी एका वाहनावरही हल्ला करण्यात आला, त्यात एक जण ठार झाला आणि चार जण जखमी झाले.
या प्रकरणी डॉन डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे की, उपायुक्त हबीबुल्ला मुसाखेल यांनी सांगितले की, नोश्कीजवळील सुलतान चरहाईच्या आसपास सुमारे 10-12 बंदूकधाऱ्यांनी क्वेटा-तफ्तान महामार्ग एन-40 ब्लॉक केला. यानंतर बसमधून नऊ प्रवाशांचे अपहरण करण्यात आले. ते म्हणाले की, बंदूकधाऱ्यांनी तफ्तानला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासली. यानंतर त्याचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली.
डॉन न्यूज टीव्हीने सांगितले की, अपहरण केलेल्या प्रवाशांचे मृतदेह जवळच्या पुलाखाली सापडले आहेत. त्यांची लूट झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नोश्की स्टेशन हाऊस ऑफिसर असद मेंगल यांनी सांगितले की, ज्या नऊ जणांची हत्या करण्यात आली ते पंजाबचे होते.
या हत्येची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने किवां प्रतिबंधीत संघटनेने स्वीकारलेली नसली तरी, या वर्षी अलीकडच्या आठवड्यात या प्रांतात बंदी घातलेल्या संघटना आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामध्ये सुरक्षा दल आणि आस्थापनांनाही खुलेआम लक्ष्य करण्यात आले आहे.
बेकायदेशीर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रांतात अलीकडच्या आठवड्यात माच शहर, ग्वादर बंदर आणि तुर्बतमधील नौदल तळावर तीन मोठे दहशतवादी हल्ले केल्याचा दावा केला आहे, ज्यात सुरक्षा दलांनी सुमारे 17 अतिरेकी मारले.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती म्हणाले की, नोश्की हायवेवर 11 लोकांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना माफ केले जाणार नाही आणि त्यांना लवकरच पकडले जाईल.
या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग केला जाईल, बलुचिस्तानची शांतता बिघडवणे हा त्यांचा उद्देश असल्याचे बुगती यांनी सांगितले.
गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनीही या घटनेचा निषेध केला आणि या दु:खाच्या वेळी सरकार मृतांच्या कुटुंबियांसोबत उभे असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.