नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याचा खास सहकारी हाफीज अब्दुल सलाम भुट्टावीचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काऊन्सिलनं याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे दुजोरा दिला आहे. सात महिन्यांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. (Hafiz Abdul Salam Bhuttavi founding member of Lashkar e Tayyiba and deputy to Hafiz Saeed is Confirmed Deceased)
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाचा संस्थापक सदस्य असलेला हाफीज अब्दुल सलाम भुट्टावी हा पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याचा सात महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. पण याची माहिती आज समोर आली आहे. भुट्टावी हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा उपनेता म्हणून कार्यरत होता. भुट्टावीचा २९ मे २०२३ रोजी पंजाब प्रांतातील तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. (Latest Marathi News)
नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवरील हल्ल्यानंतर काही दिवसांतच हाफीज सईदला ताब्यात घेण्यात आलं होतं. तसेच जून २००९ पर्यंत त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं. भुट्टावीनं या काळात लष्कर-ए-तैय्यबाचं दैनंदिन कारभार सांभाळला होता. तसेच संघटनेच्यावतीनं निर्णयही घेतले होते. (Marathi Tajya Batmya)
मृत्यू पावलेला भुट्टावी हा लष्कर-ए-तैय्यबा आणि जमात-ए-उद-दावा या दहशतवादी संघटनांच्या प्रमुख लोकांपैकी एक होता. तो संघटनेतील सदस्यांना निर्देश द्यायचा तसेच उद-दावाच्या कारवायांसाठी फतवे जाहीर करत होता. भुट्टावीनं आपल्या भाषणातून मुंबई हल्ल्यासाठी आत्मघातकी पथक तयार करण्यासाठी मदत केली होती. या हल्ल्यात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक लोक जखमी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.