Pakistan Election Result : पाकिस्तानी मतदारांनी दहशातवादाला नाकारलं! हाफिज सईदच्या मुलाचा दारूण पराभव

Pakistan Election Result : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर केले जात आहेत. पीटीआय समर्थित उमेदवार आणि नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्यात लढत पाहायला मिळत आहे
Pakistan Election Result
Pakistan Election ResultSakal
Updated on

Pakistan Election Result : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर केले जात आहेत. पीटीआय समर्थित उमेदवार आणि नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. दहशतवादी हाफिज सईदमुळे भारतीयांनाही या निवडणुकीत उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळत आहे. सईदचा पक्ष पाकिस्तानी मरकझी मुस्लिम लीगने अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.

यापैकी एका जागेवर हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदही उमेदवार होता. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत तल्हा सईद यांचा दारूण पराभव झाला आहे. सईद लाहोरच्या NA-122 जागेवरून उमेदवार होता पण पाकिस्तानच्या मतदारांनी दहशतवादाला नकार देत त्याचा पराभव केल्याचे दिसून येत आहे.

निकालात तल्हा सहाव्या क्रमांकावर राहिला. त्याला केवळ 2,042 मते मिळाली. तल्हाचा पराभव करणाऱ्या नेत्याचे नाव लतीफ खोसा असून ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात. लाहोरच्या या जागेवरून लतीफ खोसा यांनी 1 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.

Pakistan Election Result
Bharat Ratna : माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्यासह नरसिंह राव अन् डॉ. स्वामिनाथन यांना 'भारतरत्न'; PM मोदींची घोषणा

कोण आहे तल्हा सईद?

तल्हा सईद हा लष्कर-ए-तैयबाचा नंबर दोनचा नेता मानला जातो. हाफिज सईदनंतर त्याचे संपूर्ण दहशतवादी साम्राज्य तल्हा सईदकडे आहे. भारत सरकारने तल्हाला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. भारतातील लष्कर-ए-तैयबाच्या हल्ल्यांमागे तल्हा सईदचा हात होता, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

लष्कर-ए-तैयबासाठी भरती आणि निधी उभारणीतही तल्हाचे नाव पुढे आले आहे. तसेच, तो भारताविरुद्ध हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप देखील आहे. तल्हा याच्यावर अनेकवेळा हल्ले झाले मात्र तो अनेकदा बचावला.

इम्रान खान लढवणार अशी चर्चा होती त्याच लाहोरमधील जागेवरून तल्हा सईदने उमेदवारी दाखल केली होती. मात्र, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक आणि एकापाठोपाठ तीन खटल्यांमध्ये शिक्षा झाल्यामुळे निवडणूक लढवता आली नाही.

Pakistan Election Result
भारताच्या विजयानंतर बांग्लादेशी फॅन्सचा मैदानावरच राडा! महिला संघावर दगडफेकीनंतर बदलला निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.