Pakistan: आधीच दारिद्र्य त्यात अर्धवट नोटांचा घोळ! पाकिस्तानमध्ये एकाच बाजूच्या नोटांची छपाई, व्हिडीओ व्हायरल

Pakistan Currency: तब्बल तीन दशकांपूर्वी आमीर खान आणि माधुरी दिक्षितचा ‘दिल’ चित्रपट झळकला होता. या चित्रपटात आमीर खानचे कंजूस वडील हजारीप्रसाद म्हणजेच अनुपम खेर हा मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना नोटा देतो.
half-printed currency notes in Pakistan Video viral on social media
half-printed currency notes in Pakistan Video viral on social media Sakal
Updated on

Pakistan Currency: तब्बल तीन दशकांपूर्वी आमीर खान आणि माधुरी दिक्षितचा ‘दिल’ चित्रपट झळकला होता. या चित्रपटात आमीर खानचे कंजूस वडील हजारीप्रसाद म्हणजेच अनुपम खेर हा मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना नोटा देतो. पण त्या नोटा एकाच बाजूने छापलेल्या असल्याचे उघडकीस येताच सर्व भिकारी अनुपम खेरला मारण्यासाठी धावतात.

अशीच गत स्टेट बँक ऑफ पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्तानातील बँकेच्या एका शाखेकडून वितरीत केलेल्या बंडलमध्ये आणि एटीएममधून आलेल्या काही नोटा एका बाजूने कोऱ्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकारामुळे नागरिक संतापले असून अर्धवट छापलेल्या नोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दिले आहेत. तसेच व्हिडिओची खातरजमा केली जात आहे.

पाकिस्तानची आथिॅक दुरावस्था जगभरात चव्हाट्यावर आली आहे. धान्यांसाठी सरकारी रेशन दुकानावर रांगा लागत असून गव्हाच्या पिठासाठी देखील मारामारी होत आहे. मात्र आता आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पाकिस्तानच्या स्टेट बँकेकडून नोटांची छपाई देखील योग्य रितीने होताना दिसून येत नाही.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जारी केलेल्या काही नोटा एकाच बाजूने छापलेल्या असून दुसऱ्या बाजूने कोऱ्या आहेत. या सदोष नोटा लोकांच्या हातात आल्याने खळबळ उडाली आहे. या नोटा परत करण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली आहे. या अर्धवट नोटाचा व्हिडिओ बँकेतील एका कर्मचाऱ्यानेच तयार केला आहे.

half-printed currency notes in Pakistan Video viral on social media
What's Wrong With India? Trend : वॉट्स राँग विथ इंडिया? सोशल मीडियावरील हा ट्रेंड नेमका आहे काय?

तक्रारीनंतर अर्धवट नोटांची माहिती उघड

पाकिस्तानचे वर्तमानपत्र डॉनच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर सदोष नोटांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने या नोटांच्या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओतील व्यक्ती हा स्वत:ला नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानच्या मॉडेल कॉलनीचा शाखा व्यवस्थापक असल्याचे सांगतो. यात तो एकाच बाजूने छापलेली एक हजार रुपयाची नोट दाखवतो. विशेष म्हणजे ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर बॅक कर्मचाऱ्यांना अर्धवट नोटांची माहिती कळाली.

half-printed currency notes in Pakistan Video viral on social media
Russian Plane Crash Video: रशियन विमानाच्या इंजिनला आग लागली अन् अनर्थ घडला; 15 जणांच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

अनेक बंडलमध्ये अर्धवट नोटा

व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती म्हणतो, अशा प्रकारचे अर्धवट छापलेल्या नोटा किती चलनात आल्या आहेत, हे ठाऊक नाही. ग्राहकांनी या नोटा परत केल्यानंतरच त्याचा शोध लागला. यानंतर हा व्यक्ती अन्य कर्मचाऱ्याकडे कॅमेरा घेऊन जातो.

तो कर्मचारी नोटांची मोजणी करत असतो आणि त्यात काही अर्धवट छापलेल्या नोटांही दिसतात. बहुतांश बंडलमध्ये दोन ते तीन नोटा अर्धवट छापलेल्या असल्याच्या आढळून आल्या आहेत.

नागरिकांचा संताप

सोशल मीडियावर अर्धवट नोटांची माहिती व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला. एक्स, फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत नागरिकांनी पाकिस्तानच्या बँकेवर लाखोली वाहिली. एका यूजरने म्हटले, बँक आणि एटीएममधून रोकड काढत असाल तर सावध राहा.

एका एका नोटांची तपासणी करा. दरम्यान, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या मुख्य प्रवक्त्याने म्हटले, ‘‘हा व्हिडिओ खरा आहे की नाही, त्याची तपासणी केली जात आहे. तसेच ही एक दुर्मीळ घटना आहे. हे प्रकरण खरे असेल तर ते बँकेच्या एका शाखेपुरतीच मर्यादित असेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.