Hamas Leader Killed : हमासचा म्होरक्या बैरूतमध्ये ठार; इस्राईलनेच हल्ला केला असल्याचा हिज्बुल्लाचा आरोप

गाझा पट्टीत इस्राईल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनच इस्राईलच्या उत्तर सीमेवर असलेल्या लेबनॉनमधूनही इस्राईलवर हिज्बुल्ला ही दहशतवादी संघटना हल्ले करत होती.
Hamas Leader Killed
Hamas Leader KilledeSakal
Updated on

गाझा पट्टीत हमास आणि इस्राईल यांच्यात युद्ध सुरू असतानाच आज लेबनॉनची राजधानी बैरूत येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यात हमासचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या सालेह अल अरौरी हा मारला गेला. हा हल्ला इस्राईलनेच केल्याचा आरोप हमासने केला आहे. आजच्या हल्ल्यामुळे हमास आणि इस्राईल यांच्यातील युद्धक्षेत्राचा विस्तार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

गाझा पट्टीत इस्राईल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनच इस्राईलच्या उत्तर सीमेवर असलेल्या लेबनॉनमधूनही इस्राईलवर हिज्बुल्ला ही दहशतवादी संघटना हल्ले करत होती.

त्यामुळेच गाझा पट्टीमध्ये हमाशी लढत असतानाच इस्राईलकडून त्यांच्यावरही प्रतिहल्ले केले जात होते. मात्र, या इस्राईलकडून होणाऱ्या या हल्ल्यांची ही व्याप्ती सीमाभागापुरतीच मर्यादित होती. आज मात्र राजधानी बैरूतमधील एका इमारतीवरच ड्रोनच्या साह्याने लक्ष्यवेधी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सालेह मारला गेला. सालेह हा हमासचा अत्यंत महत्त्वाचा म्होरक्या होता. हमासच्या सशस्त्र विभाग त्यानेच सुरू केला होता. हमास आणि हिज्बुल्ला यांचा एकमेकांना पाठिंबा असल्याने सालेहच्या मृत्युचा सूड घेण्याचा इशारा हिज्बुल्लाचा म्होरक्या सईद हसन नसरल्ला याने आज दिला आहे.

Hamas Leader Killed
Israel-Hamas War: भारतातील मुलं जल्लोष करतायत अन् तिकडे गाझामध्ये.... इस्राइल-हमास युद्धाबाबत काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

इस्राईलने अधिकृतपणे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी यामागे त्यांचाच हात असल्याचा दावा हमासने केला आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला ड्रोन इस्रायली बनावटीचा होता, असे लेबनॉनमधील माध्यमांनी म्हटले आहे. इस्राईलच्या संरक्षण विभागाने मात्र थेट प्रतिक्रिया न देता, ‘हमासविरोधातील आमचा लढा सुरूच राहील,’ असे सांगितले आहे.

व्याप्ती वाढण्याचा अंदाज

ड्रोनहल्ला झाला त्या भागावर हिज्बुल्लाचे वर्चस्व आहे. सीमेवर हिज्बुल्लाकडून हल्ले सुरू असले तरी त्यांचे प्रमाण कमी होते. आज त्यांच्या नियंत्रणाखालील भागातच थेट हल्ला झाल्याने इस्राईलच्या संपूर्ण उत्तर सीमेवर हिज्बुल्ला सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Hamas Leader Killed
''हिंदुंना जगाशी प्रॉब्लेम नसतो, मात्र दरवेळी मुस्लिमच...'' हमास सहसंस्थापकाच्या मुलाचं स्फोटक विधान

दरम्यान, हमासचा म्होरक्या सालेह अल अरौरी याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर इस्राईलची गुप्तचर संस्था असलेल्या ‘मोसाद’ने, हमासच्या प्रत्येक दहशतवाद्याला शोधून काढून मारून टाकू, असा इशारा दिला आहे. बैरूतमधील हल्ल्याची जबाबदारी इस्राईलने स्वीकारली नसली तरी ‘मोसाद’चे प्रमुख डेव्हिड बार्निया यांनीच केलेल्या या विधानामुळे हल्ल्यामागे त्यांचाच हात असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.