Isarel Hamas Conflict:हमासने इस्राइलवर हल्ला चढवल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजला होता. अनेक इस्राइली नागरिकांच हमासच्या दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आलं होतं. त्यांनी अनेक नागरिकांना ओलीस ठेवले होते आणि त्या नागरिकांना त्रास दिला जात होता.
सोमवारी (दि.१६ ऑक्टोबर) इराणच्या नेत्यांकडून असा दावा करण्यात आला होता की इस्राइलसोबत वाटाघाटी तयार करण्याती हमासची तयारी आहे आणि जर इस्राइलच्या प्रशासनाने काही अटी मान्य केल्या तर हमास ओलीस ठेवलेल्या २०० नागरिकांना हमासकडून सोडण्यात येईल. हा दावा हमासच्या म्होरक्यांनी फेटाळला होता. मात्र, त्यानंतर पुढच्याच दिवशी हमासकडून २२ इस्राइली ओलिसांची कत्तल कऱण्यात आली.
हमासकडून २२ ओलिसांची हत्या घडवून आणल्यानंतर इस्राइलकडून हल्ल्याची तीव्रता वाढवली जाऊ शकते. इस्राइलकडून गाझापट्टीवर हवाई हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी इस्राइलच्या लष्कराकडून सामन्य नागरिकांना गाझापट्टी सोडण्याचा इशारा देण्यात आला होता. दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर इस्राइलकडून गाझापट्टीवर एअर स्ट्राईक करण्यात येणार होती.
तत्पुर्वी, संयुक्त राष्ट्राकडूनही हमासला सर्व ओलिसांना विनाशर्त सोडावे, अशा इशारा देण्यात आला होता. गाझापट्टीत अडकलेल्या लोकांना अन्न, पाण्याची गरज आहे. या जीवनावश्यक वस्तुंचा संयुक्त राष्ट्राकडे साठा आहे. जर इस्राइलकडून हवाई हल्ले थांबवण्यात आले तर, या गोष्टी नागरिकांना पोहोचवल्या जाऊ शकतात.
मंगळवारी (दि. १७ ऑक्टोबर) हमासने इस्राइलवर केलेल्या हवाई हल्ल्याला १० दिवस पुर्ण झाले. हमासकडून इस्राइलवर रॉकेट हल्ला केला होता, ज्यानंतर इस्राइलने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. ज्यानंतर तेथील भाग बेचिराख व्हायला सुरुवात झाली. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.