Israel-Hamas War: हमासच्या लीडरसह तब्बल 8 हजार दहशतवाद्यांचा खात्मा; उत्तर गाझावर इस्रायली मोठा लष्कराचा मोठा दावा!

जबलिया भागात बटालियन कमांडर, डेप्युटी ब्रिगेड कमांडर आणि ११ कंपनी कमांडर मारले आहेत. जे दहशतवाद्यांचे नेतृत्व करत होते. या भागात मारला गेलेला सर्वात मोठा दहशतवादी अहमद रांदोर आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas War
Updated on

Israel-Hamas War: इस्त्राईली सैनिकांनी हमासचा पूर्ण खात्मा केला आहे. लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी माहिती दिली आहे. उत्तर गाझातील सुमारे ८ हजार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याशिवाय परिसरातील हजारो शस्त्रे आणि लाखो कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. उत्तर गाझा पट्टीतील हमासचे दहशतवादी आता नेतृत्वहीन झाले त्यांच्याकडे सूचना द्यायला कमांडर देखील नसल्याचे डॅनियल हगारी यांनी स्पष्ट केले.

जबलिया भागात बटालियन कमांडर, डेप्युटी ब्रिगेड कमांडर आणि ११ कंपनी कमांडर मारले आहेत. जे दहशतवाद्यांचे नेतृत्व करत होते. या भागात मारला गेलेला सर्वात मोठा दहशतवादी अहमद रांदोर आहे. कमांडर मारल्यानंतर दहशतवाद्यांना संघटित पद्धतीने लढणे कठीण झाले आहे. यानंतर अनेक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे डॅनियल हगारी यांनी सांगितले.

हगारी पुढे म्हणाले की, जबालिया हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. अशा भागात प्रवेश करण्यापूर्वी आम्ही तिथून लोकांना बाहेर काढतो, जेणेकरून सर्वसामान्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये. (Latest Marathi News)

डॅनियल हगारी (Daniel Hagari) म्हणाले, जबालिया येथे इंडोनेशियन रुग्णालयासह दोन रुग्णालये होती. येथे भूमिगत पायाभूत सुविधा, शस्त्रे आणि लष्करी उपकरणे होती. दोन्ही ठिकाणी विशेष मोहीम राबवून दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या. या वेळी डॉक्टर, वैद्यकीय पथक किंवा रुग्णांना कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेण्यात आली.

हमासचे दहशतवादी सामान्य लोकांच्या वेशात पळून जाण्याचा किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करू नयेत म्हणून लोकांना तेथून हटवण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे. एकट्या जबलियामध्ये ६७० हवाई हल्ले करण्यात आले. हे हल्ले गुप्तचर माहितीच्या आधारे, तंतोतंत लक्ष्यावर आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून करण्यात आले.

Israel-Hamas War
दिल्लीतून मुंबईत आले ATS च्या जाळ्यात अडकले! 6 जणांना अटक, 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.