Israe Hamas War: गाझा पट्टीतील कारवाई पूर्वीच्याच तीव्रतेने सुरू; अमेरिकन नागरिकाचाही मृत्यू
Hamas Israel War: हल्ल्यात आपल्याच नागरिकांना मारण्याची चूक झाल्यानंतर गाझा पट्टीतील कारवाई पूर्वीच्याच तीव्रतेने सुरू ठेवण्याचा निर्धार इस्राईल सरकारने व्यक्त केला आहे. इस्राईलच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टीमध्ये सलग चौथ्या दिवशी दूरसंचार सेवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले.
केवळ हमासला लक्ष्य केले जात असल्याचा इस्राईलचा दावा असला तरी, शरणागतीचा पांढरा झेंडा हातात घेऊन जात असलेल्या तीन जणांचा सैनिकांचा गोळीबारात मृत्यू झाला. नंतर हे तिघे जण ओलिस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांपैकी असल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यामुळे इस्राईलकडून गाझामधील सरसकट सर्वच जणांवर हल्ले होत असल्याचे सिद्ध झाल्याची टीका होत आहे. मात्र, तरीही हमासला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे इस्राईलच्या लष्कराने सांगितले. आज इस्राईलच्या सैनिकांनी खान युनिस शहर आणि परिसरातील हमासच्या अनेक ठिकाणांवर हल्ले केले. इतरही अनेक भागांमध्ये हवाई हल्ले झाले.
इस्राईलच्या हल्ल्यांमध्ये मागील महिन्यता अमेरिकेच्या ‘एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या एका कंत्राटदाराचाही मृत्यू झाला होता, अशी माहिती आज संबंधित कंत्राटदाराच्या सहकाऱ्याने माध्यमांना दिली. इस्राईलने हल्ला करताना सामान्य नागरिकांच्या जिवाची काळजी घ्यावी, असे आवाहन या संस्थेने केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.