Israel-Hamas Conflict: हमास नरमतोय! इस्त्राइली महिला आणि तिच्या चिमुकल्या मुलाची केली सुटका; पाहा व्हिडिओ

Israel-Hamas Conflict
Israel-Hamas Conflict
Updated on

नवी दिल्ली- इस्त्राइल आणि हमासमधील युद्धाचा आज गुरुवारी सहावा दिवस आहे. शनिवारी सुरु झालेल्या या युद्धाने उग्र रुप धारण केले आहे. दोन्ही गटांकडून तीव्र संघर्ष सुरु झाला आहे. त्यातच हमासने एक महिला आणि तिच्या लहान मुलाला त्यांच्या कैदेतून सोडले आहे. हमासने त्यांना सोडण्याचा निर्णय का घेतला, याबाबत निश्चित उत्तर कळू शकलेलं नाही.

शनिवारी हल्ला केल्यानंतर हमासने अनेक इस्त्राइली नागरिकांचे अपहरण केले आहे. माहितीनुसार, जवळपास १५० पेक्षा जास्त लोकांना हमासने आपल्या कैदेत ठेवले आहे. हमासने यासंदर्भात इशारा दिला असून, इस्त्राइलने नागरिकांच्या वस्तीवर हल्ला केल्यास या लोकांना मारले जाईल असं म्हटलं आहे. (Hamas just released an Israeli woman and her child from captivity in Gaza, demonstrating goodwill for further negotiations)

हमासने युद्धाला तोंड फोडले असले तरी याचा शेवट इस्त्राइल करेल असं चिन्ह आहे. कारण, इस्त्राइलने भीषण प्रतिक्रार सुरु केला आहे. गाझा पट्टीतील अनेक इमारतींना उद्धवस्त करण्यात आले आहे. तसेच गाझा पट्टीला घेरण्यात आले असून अन्न, इंधन आणि औषध पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला आहे.

जॅक्सन हिंकले यांनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, एक इस्त्राइली महिला आणि तिच्या मुलाला हमासने सोडलं आहे. हमासने एक चांगली कृती म्हणून असं केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात आई आणि मुलगा यांची भेट होताना दिसत आहे.

Israel-Hamas Conflict
Israel-Hamas War: गुजराती वंशाच्या लेकी इस्राइलच्या आर्मीमध्ये, हमास विरुद्धच्या लढ्यात बजावतायत महत्वाची कामगिरी

हमासला नष्ट करण्याचा इस्त्राइलने निश्चय केला आहे. जोपर्यंत प्रत्येक हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असं इस्त्राइली पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू म्हणाले आहेत. यासाठी एका वेगळ्या सरकारची स्थापना करण्यात आली आहे. इस्त्राइलच्या युद्धात अमेरिकेनेही त्यांना साथ दिली आहे. तसेच सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.