लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने पुन्हा एकदा इस्राइलवर मोठा हल्ला चढवला आहे. हमास नेता शेख सालेह अल-अरुरीच्या मृत्यूनंतर हा हल्ला करण्यात आला आहे. हिजबुल्लाहने इस्त्राइलवर एकापाठोपाठ एक ६२ क्षेपणास्त्रे डागली आहेत.
हमास नेता अल-अरुरी याचा मृत्यू मागील आठवड्यात बेरुत येथे झाला होता. हिजबुल्लाहचे म्हणणे आहे की इस्त्राइल वर हा हल्ला हमास नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला आहे.
हिजबुल्लाहने हा क्षेपणास्त्र हल्ला उत्तर इस्त्राइलमध्ये केले आहे. हिजबुल्लाहने निवेदन जारी करत याबद्दल माहिती दिली आहे. ६२ वेगवेगळ्या प्रकराकची क्षेपणास्त्रे इस्त्राइलवर डागण्यात आली आहेत. हा हल्ला कंट्रोल बेसवर करण्यात आला आहे.
इस्त्राइलने देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. इस्त्राइली सैन्याने दावा केला की या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी एक टेररिस्ट सेलला टार्गेट केलं, मात्र त्यांनी इस्त्राइली सेनेने या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाहीये.
मीडिया रिपोर्ट्सनुसार इस्त्राइली वायुसेना मेरोन एअर कंट्रोल वर आपले फायटर प्लेउ उतरवू शकली नाही कारण हिजबुल्लाहच्या हल्ल्यात रनवेचे मोठे नुकसान झाले होते.
काही दिवसांपूर्वीच हमासचा नेता शेख सालेह अल-अरुरी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये ड्रोन हल्ल्यात ठार झाला होता. या ड्रोन हल्ल्यासाठी इस्त्राइलाला थेट जबाबदार ठरवण्यात आले होते. मात्र इस्त्राइलने याला दुजोरा देणे किंवा आरोप फेटाळणे टाळले, पॅलेस्टिनी हद्दीबाहेर हमासच्या नेत्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. हमासने इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले होते. त्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली होती. इस्त्राइलसोबतच्या युद्धात लेबनॉनची हिजबुल्लाह संघटना हमासला मदत करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.