तेल अवीव- इस्राइल आणि हमास संघर्षाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही गटांमध्ये अजूनही तुंबळ संघर्ष सुरु आहे. त्यातच हमासने ७ ऑक्टोंबर रोजी केलेल्या हल्ल्याचा एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हमासने दावा केलाय की, त्यांनी इस्राइली लष्करी तळावर हल्ला केलाय. (Hamas Releases Chilling New Video Of Attack On Israel Base Showing Capture Of IDF Soldier Watch)
व्हिडिओमध्ये एका लष्करी तळावर संघर्ष सुरु असल्यातं दिसतंय. किसुफीम बटालियन तळावर हा संघर्ष सुरु आहे. येथील इस्राइली जवानांना ताब्यात घेतलं जातंय किंवा त्यांना मारलं जात आहे. हल्ला 'अल अक्सा फ्लूड' ऑपरेशन अंतर्गत करण्यात आल्याचं हमासने म्हटलं आहे.
हमास आणि इस्राइलमध्ये संघर्ष सुरु असून दररोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत. हमासच्या अत्याचाराचे आणि क्रूरतेचे दर्शन यातून होत आहे. हमासने अनेक इस्राइली नागरिकांचे अपहरण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हमासने १५० पेक्षा अधिक इस्राइली नागरिकांचे अपहरण केलंय. त्यांच्या सुटकेसाठी इस्राइली सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
हमासने अनेक लहान मुलांची हत्या केली. त्यांचे शिरकान केले. अनेक महिलांवर बलात्कार केला असा आरोप इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी पाहिले असल्याचं म्हटलं आहे. अनेक नागरिकांना जिवंत जाळण्यात आले. असंही ते म्हणाले आहेत. जोपर्यंत हमासच्या प्रत्येक सदस्याला संपवत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार नेतान्याहू यांनी केला आहे.
इस्राइलने केलेल्या दाव्यानुसार १२०० पेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तर २ हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हमासचे जवळपास एक हजार नागरिक मारले गेल्याची माहिती आहे. संघर्ष सुरुच असल्याने येत्या काळात मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीये. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.