कोरियाच्या 'हान कांग' यांना साहित्याचे नोबेल

जीवनाची क्षणभंगुरता दाखविणाऱ्या साहित्याचा सन्मान !
han kang wins 2024 nobel prize in literature for poetic prose
Han Kangsakal
Updated on

स्टॉकहोम: साहित्य क्षेत्रातील २०२४ चा नोबेल सन्मान दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना आज जाहीर करण्यात आला. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सने त्यांच्या सखोल काव्यात्मक गद्य लेखनासाठी हा सन्मान देत असल्याचे म्हटले आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उत्कट तरल अशा काव्यात्मक गद्य लेखनातून कांग यांनी ऐतिहासिक आघातांचे वर्णन करत मानवी जीवनाची क्षणभंगुरता दाखवून दिली असल्याचे नोबेल निवड समितीने म्हटले आहे.

स्वीडिश अकादमीचे सचिव मॅट्स माल्म यांनी आज पत्रकार परिषदेत ५३ वर्षीय हान यांना नोबेल सन्मान जाहीर केला. मानवी जीवनातील गुंतागुंत आणि संवेदनशीलतेला अतिशय सोप्या भाषेत पण मार्मिकरित्या सादर केलेले लेखन वाचकांना विचार करण्यास

प्रवृत्त करते, असे माल्म यांनी म्हटले आहे. शरीर आणि आत्मा, जीवन आणि मृत्यू यांच्यात संबंध असल्याची जाणीव त्यांनी आपल्या लेखनातून, आणि तीदेखील अत्यंत प्रयोगशील आणि काव्यात्मक पद्धतीने, व्यक्त केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हान यांच्या ‘द व्हेजिटिरियन’ कादंबरीला २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर सन्मान प्राप्त झाला आहे. या कादंबरीत एक महिला मांसाहार करणे थांबविण्याचा निर्णय घेते तेव्हा निर्माण होणाऱ्या अडचणींचे चित्रण मांडले आहे.

han kang wins 2024 nobel prize in literature for poetic prose
Global Temperature : जागतिक तापमानाने मोडला ८४ वर्षांचा विक्रम ;यंदाचा २१ जुलै ठरला सर्वाधिक उष्ण,युरोपियन क्लायमेट एजन्सीची माहिती

त्यांची ह्यूमन ॲक्ट्स’ ही कादंबरीही २०१८ च्या बुकर पुरस्कारासाठीच्या अंतिम यादीत पोहोचली होती. ‘द व्हाइट बुक’, ‘ग्रीक लेसन्स’ अशी त्यांची त्यांची अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. आपल्या साहित्यातून त्यांनी मानवता, संघर्ष आणि भावनिक संबंधांना अतिशय हृदयस्पर्शी भावनेच्या माध्यमातून मांडले आहे.

महिलेला सन्मान मिळाल्याचे समाधान

साहित्यातील नोबेल सन्मानास सुरुवातीपासूनच टीकेचा सामना करावा लागला आहे. बोजड भाषेत लिहिणाऱ्या तसेच, हलक्या स्वरूपाचे गद्य लिहिणाऱ्या युरोपीय आणि उत्तर अमेरिकी लेखकांनाच साहित्यातील नोबेल सन्मान दिला जातो, अशी टीका केली गेली आहे. तसेच सन्मान देताना पुरुषांनाच प्राधान्य दिले जात असल्याचीही टीका झाली आहे. आतापर्यंतच्या ११९ विजेत्यांत केवळ १७ महिला आहेत. २०२२ मध्ये साहित्यातील नोबेल जिंकणाऱ्या शेवटच्या महिला फ्रान्सच्या ॲनी अरनॉक्स या आहेत. दोनच वर्षांत पुन्हा एका महिलेला हा सन्मान मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

(नोबेल सन्मान विजेत्यांना ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.