येत्या वर्षात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक होणार आहे. यासाठी आतापासूनच चुरस पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. या पदासाठी काही भारतीय मूळ असलेले अमेरिकन देखील आहेत. निकी हेली (Nikki Haley) , विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) , हर्षवर्धन सिंह(harshavardhan siha) अशी यांची नाव आहेत
निकी हेली
भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निकि हेली या देशातील एक बड्या महिला नेत्या आहेत. दक्षिण कॅरोलिना या ठिकाणच्या त्या दोनदा गव्हर्नर होत्या. त्या संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या राजदूत राहिल्या आहेत.
सलग तीन निवडणुकांमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या निक्की हेली या तिसऱ्या भारतीय-अमेरिकन आहेत. त्यांनी कित्येक दशलक्ष डॉलर्सची देणगी उभी केली आहे.
The Stand for America Fund Inc. यासाठी त्यांनी एप्रिल ते जून या कालावधीत $18.7 दशलक्ष जमा केले होते. त्यांना अब्जाधीश केनेथ लँगोन, अ्ॅलीस वॉल्टन आणि केनेथ फिशर यांच्यासह श्रीमंत देणगीदारांचा पाठिंबा आहे.
हेली यांचा जन्म शीख कुटुंबात झाला आहे. अजित सिंग रंधावा आणि राज कौर रंधावा हे त्यांचे पालक आहेत. 1960 च्या दशकात पंजाबमधून कॅनडा आणि नंतर अमेरिकेत त्यांचे पालक गेले. वयाच्या 39 व्या वर्षी, हेली अमेरिकेतील सर्वात तरुण गव्हर्नर झाल्या.
विवेक रामास्वामी
भारतीय-अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी यांनी फेब्रुवारीमध्ये 2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. रिपब्लिकन पक्षात ते बाहेरचे व्यक्ती म्हणून पाहिले जातात. मात्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांच्या नंतर त्यांचच नाव घेण्यात येत आहे.
आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान उद्योजक विवेक रामास्वामी यांना रिपब्लिकन पक्षाच्या ९ टक्के नेत्यांचा पाठिंबा आहे. रामास्वामी यांचा जन्म अमेरिकेतील सिनसिनाटी, ओहायो येथे झाला. त्याचे पालक केरळमधील पलक्कड येथून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.
हर्षवर्धन सिंह
भारतीय वंशाचे असलेले हर्षवर्धन सिंह अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत सामील झाले आहेत. स्वतः एरोस्पेस अभियंता असलेले हर्षवर्धन हे एका व्हिडिओमध्ये म्हटले होते कि, ते आयुष्यभर रिपब्लिकन राहिले. त्यांनी नेहमीच अमेरिका फर्स्ट या धोरणाखाली काम केले.
सिंह यांनी रिपब्लिकन पक्षासाठी न्यू जर्सीमधील पुराणमतवादी शाखा पुनर्संचयित करण्यासाठी काम केले. टेक आणि फार्मा कंपन्यांच्या भ्रष्टाचाराबाबत ते म्हणाले की, आपल्या स्वातंत्र्यावर सातत्याने हल्ला होत आहे. गेल्या काही वर्षांत बरेच बदल झाले आहेत. म्हणूनच बदल उलटवून अमेरिकन मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. यामुळे, मी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंह यांनी 2017 आणि 2021 मध्ये न्यू जर्सीच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवली होती. 2018 मध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवलेली होती, 2020 मध्ये रिपब्लिकन प्राइमरीमध्ये सिनेटसाठी निवडणूक लढवली होती.
आपण स्वतः राष्ट्रपती पदासाठी एकमेव स्वच्छ उमेदवार आहोत. कारण आपण कोविडची लस घेतली नाहीये असे सिंग म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.