वॉशिंग्टन- अमेरिकेतली एका नर्सला जवळपास ७०० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नर्सने केलेले कृत्य अत्यंत अमानवी आहे. नर्सने अनेक रुग्णांना इन्सुलिनचा जास्त प्रमाणात डोस दिला होता. त्यामुळे १७ रुग्णांचा मृत्यू झालाय. १७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी तिला ३८० ते ७६० वर्षांची शिक्षा झाली आहे.
हेदर प्रेसडी (Heather Pressdee) ही ४१ वर्षीय महिला पेनेसेल्विनियाची रहिवाशी आहे. प्रेसडीने २२ रुग्णांना मर्यादेपेक्षा जास्त इन्सुलिनचा डोस दिला होता. ज्यांना मधुमेहाची समस्या नव्हती त्यांना देखील प्रेसडीने डोस दिला होता. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असताना तिने हे कृत्य केलं. यात अनेक रुग्णांचा तात्काळ मृत्यू झाला, तर काहींचा काही वेळाने मृत्यू झाला. मृत रुग्णांचे वय ४३ ते १०४ च्या दरम्यान होते.
इन्सुनिलचा ओव्हरडोस दिल्यामुळे हायपोग्लाइसेमिया होतो. यामुळे लोकांचे हृदयाचे ढोके वाढतात आणि हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. मागील वर्षी मे महिन्यामध्ये दोन रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी प्रेसडीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर तिने केलेले आणखी कृत्ये समोर आली.
पीडितांच्या कुटुंबीयांनी नर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. महिला शैतान आहे तिने स्वत:च लोकांचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नर्स आपल्या रुग्णांचा द्वेष करायची. शिवाय, त्यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी करायची.
आरोपी नर्सने आपल्या आईला केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 'मला या रुग्णांचा खूप राग येतो. माझे सहकारी आणि रेस्टॉरंटमध्ये भेटलेल्या लोकांची देखील मला चिड येते. मला त्यांना मारायचं आहे.' प्रेसडी हिने आपला गुन्हा कोर्टामध्ये कबुल केला आहे.
ती आजारी नाही किंवा मानसिकदृष्ट्या कमकुवत नाही. ती एक दृष्ट व्यक्ती आहे. तिने माझ्या वडिलांना मारल्यानंतर मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पण तिच्यामध्ये काहीच पश्चाताप दिसत नव्हता, असं पीडित कुटुंबातील एका व्यक्तीने कोर्टात सांगितले. प्रेसडी हिने २०१८ ते २०२३ दरम्यान अनेक रुग्णालयांमध्ये नर्सचे काम केले आहेत. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिचा परवाना रद्द करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.