Putin opponent killed in odisha: ओडिशातच नव्हे तर आजवर पुतीन यांच्या १० विरोधकांचा गूढ मृत्यू...

युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दहा टीकाकारांचा रहस्यमय मृत्यू
Putin
PutinEsakal
Updated on

4 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दहा टीकाकारांचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. अलीकडेच, भारतातील ओडिशा राज्यातील एका हॉटेलमध्ये रशियन उद्योगपती पावेल अँटोनोव्ह यांचा मृतदेह सापडला होता. अँटोनोव्ह हे सॉसेज टायकून होते आणि त्यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त भारतात उपस्थित होते.

रायगड, ओडिशातील पंचतारांकित हॉटेलच्या खिडकीतून पडून झालेल्या त्यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अँटोनोव्ह हे मॉस्कोच्या पूर्वेकडील व्लादिमीर शहरातील एक प्रसिद्ध नाव होते. पुतिन यांच्या युक्रेन हल्ल्याला त्यांनी विरोध केला. त्यांनी व्लादिमीर स्टँडर्ड ही मांस कंपनी सुरू केली. अँटोनोव्ह यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या आधी अनेक प्रतिष्ठित रशियन नागरिकांचा गूढ मृत्यू पुतीन यांना प्रश्नांच्या वर्तुळात टाकत आहे.

जूनमध्ये अँटोनोव्ह यांनी युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा त्यांच्या पद्धतीने निषेध केला. अँटोव्ह यांनी व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या संदेशात निषेध केला. युक्रेनची राजधानी कीव अंतर्गत शेवचेनकिवस्की जिल्ह्यावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सात वर्षांची मुलगी आणि तिची आई जखमी झाली. तिथे एक व्यक्ती मरण पावली होती जो त्या मुलीचा बाप आहे असे मानले जात होते. हल्ल्यामुळे दु:खी झालेल्या अँटोनोव्हने लिहिले की, 'मुलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजते. तिच्या आईला क्रेनने बाहेर काढण्यात आले. ती दगडाखाली गाडली गेली.' यानंतर त्यांनी लिहिले की, 'खर सांगायचे तर याला दहशतवाद सोडून दुसरे काहीही म्हणणे फार कठीण आहे.'

अँटोनोव्ह व्यतिरिक्त, 52 वर्षीय पावेल चेलनिकोवचा मृतदेह देखील त्याच्या मॉस्कोमधील अपार्टमेंटमध्ये सापडला होता. गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. पावेल चेलनिकोवने स्वत:वर गोळी झाडल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे. पावेल चेलनिकोव हे सरकारी रेल्वे कंपनीत अधिकारी होते. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी कुटुंबासोबत सुट्टीचा फोटो शेअर केला होता. अशा परिस्थितीत त्यांच्या आत्महत्येची बातमी येताच सर्वांनाच धक्का बसला.

पुतीन सरकारचा रशियाच्या रेल्वेवर खूप दबाव असल्याचे सांगण्यात आले. रशियन मीडियाच्या मते, रेल्वे युक्रेनियन हॅकर्सपासून स्वतःचा बचाव करू शकली नाही आणि अशा परिस्थितीत तिला आपले नेटवर्क बंद करावे लागले. त्यामुळे युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. 27 फेब्रुवारी रोजी या कंपनीवर युरोपियन युनियन (EU) ने बंदी घातली होती.

पावेल चेलनिकोवच्या मृत्यूच्या काही आठवड्यांपूर्वी, पुतिनच्या जवळचे अनातोली गेराशचेंको फ्लाइटच्या पायऱ्या उतरत असताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, 73 वर्षीय गेराशचेंको , जे एव्हिएशन मेजर देखील होते, मॉस्को एव्हिएशन इन्स्टिट्यूट (MAI) च्या अनेक पायऱ्यांवरून पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. गेराशचेंकोबद्दल असे म्हटले जात होते की काही वर्षांपूर्वी ते अध्यक्ष पुतिन यांच्या जवळच्या व्यक्तींच्या यादीतून वगळले होते. यामुळे त्यांना सात वर्षांपूर्वी त्यांना पद सोडावे लागले होते.

Putin
China Corona Outbreak : आकडे लपविण्याच्या आरोपांमुळे चीन सरकारने घेतला निर्णय; पुढच्या महिन्यापासून...

सप्टेंबरमध्ये, रशियासाठी आर्क्टिक संसाधने विकसित करणारे पुतीन यांच्या जवळचे इव्हान पेचोरिन यांचा मृत्यू देखील अत्यंत रहस्यमय मानला जात होता. पेचोरिन, वय 29, बोटीतून पडला आणि त्याच वेळी मरण पावला. पेचोरिन ही अशी व्यक्ती होती ज्याने रशियासाठी आर्क्टिकमध्ये अनेक संसाधने शोधली.

Putin
Putin opponent killed in odisha: खतरनाक गुप्तहेर राष्ट्राध्यक्ष झाला अन्..

त्याचप्रमाणे रशियातील तेल व्यावसायिक राविल मैगनाओव यांचाही रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. 64 वर्षीय राविल मैगनाओव हे रशियन तेल कंपनी लकऑयलचे प्रमुख होते. मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिक हॉस्पिटलमधून पडल्यानंतर त्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून पडलेल्या मैगनाओवचा मृत्यू अत्यंत गूढ मानला जात होता. 25 फेब्रुवारी रोजी, युक्रेन युद्ध सुरू झाल्याच्या एका दिवसानंतर, रशियन गॅस कंपनी गैजप्रोमचे वरिष्ठ उपमहासंचालक दर्जाचे अधिकारी अलेक्झांडर टायुलाकोव यांचा मृतदेह त्याच्या मैत्रिणीला सापडला. 61 वर्षीय अलेक्झांडरचा मृतदेह त्याच्या घराच्या गॅरेजमध्ये आढळून आला.

Putin
Pune News : पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या रुपाली पाटील थेट CM शिंदेंच्या भेटीला

अलेक्झांडरच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांपूर्वी, लेनिनग्राड प्रदेशातील आणखी एका उच्चभ्रू समाजात 60 वर्षीय लियोनिद शुलमैनचा मृतदेह सापडला होता. ते गैजप्रॉम इन्व्हेस्टमध्ये वाहतूक प्रमुख होते. शुलमनचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला होता आणि त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले झाले होते. त्याचप्रमाणे, 51 वर्षीय व्‍लादिस्‍लाव एवायेव, गॅझप्रॉम्बँकचे उपाध्यक्ष, यांची त्यांच्या मॉस्कोमधील पेंटहाऊसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Putin
PM Modi's Mother : PM नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

स्पेनमध्ये 55 वर्षीय सर्गेई प्रोटोसेन्‍याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मार्चमध्ये, रशियन अब्जाधीश वसीली मेलनिको, त्यांची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह निझनी नोव्हगोरोडमधील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये लटकलेले आढळले. त्याच्या शरीरावर जखमा आढळल्या. पोलिसांनी या घटनेवर सांगितले होते की, मेलनिकोने आधी आपल्या कुटुंबाची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. तर त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की त्यांचा विश्वास नाही की मेलनिको त्याच्या कुटुंबाचे किंवा इतर कोणाचेही वाईट करू शकतात.

Putin
Pune Congress Bhavan: जिथे एकेकाळी राज्य केलं त्याच वास्तुमध्ये पवार तब्बल 24 वर्षानंतर भेटीला..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.