वर्कफोर्स कंसल्टेंसी ईसीए इंटरनेशनलच्या सर्वेनुसार पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये महागाई कमी होऊन भारत पगारवाढीत अव्वल असणार. सोबतच या रिपोर्टनुसार पाकिस्तान, श्रीलंका चीन सारख्या देशांना भारत मागे टाकणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
68 देशांमधील 360 हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांकडून एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे सॅलरी ट्रेंड सर्व्हे करण्यात आला. त्यातून ही बाब समोर आली आहे.
या सर्व्हेतून समोर आले की जगातील 37% देशांमध्ये २०२३ मध्ये पगार वाढ होणार ज्यामध्ये भारत अव्वल असणार.
विशेष म्हणजे आशियाई देशांसाठी आनंदाची बाब आहे. कारण पगार वाढणाऱ्या टॉप 10 देशांमध्ये 8 आशियाई देशांचे नाव आहे. यात सर्वात पहिले नाव भारताचे आहे. भारतात 4.6% पगार वाढीची शक्यता आहे. तर दुसऱ्या स्थानी वियतनामचे नाव आहे, येथे पगार वाढीची शक्यता 4.0% आहे. त्यानंतर चीनचं नाव आहे येथे 3.8% पगार वाढीची शक्यता आहे.
2022च्या पहिल्या सहा महिन्यामध्ये नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले होते. जवळपास 20.3 टक्के लोकांनी या काळात नोकऱ्या सोडल्या. या कारणांमुळे पगार वाढीचा दबाव असल्याचे बोलले जात आहे.
सर्वात जास्त हाइक ई-कॉमर्स कंपन्यांना दिली जाऊ शकते. या सेक्टरमधील कर्मचाऱ्यांचा पगार 12.8 टक्के वाढू शकतो. प्रोफेशनल सर्विसेजमध्ये 12.1 टक्के तर आईटी सेक्टरमध्ये 1.3 टक्के आणि फाइनेंशियल सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार 10.5 टक्के वाढू शकतो
2023 मध्ये पगारवाढ होणाऱ्या देशांची नावे क्रमवारीनुसार-
India (4.6 per cent)
Vietnam (4.0 per cent)
China (3.8 per cent)
Brazil (3.4 per cent)
Saudi Arabia (2.3 per cent)
Malaysia (2.2 per cent)
Cambodia (2.2 per cent)
Thailand (2.2 per cent)
Oman (2.0 per cent)
Russia (1.9 per cent)
Pakistan (-9.9 per cent)
Ghana (-11.9 per cent)
Turkey (-14.4 per cent)
Sri Lanka (-20.5 per cent)
Argentina (-26.1 per cent)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.