Viral Video: समुद्री चाचांना भारतीय नौदलाचा हिसका, बांगलादेशी जहाजासह 23 लोकांची सुटका

MV Abdullah: या महिन्याच्या सुरुवातीला नौदलाने 11 इराणी आणि आठ पाकिस्तानी नागरिकांच्या क्रू ची सोमालियाच्या पूर्व किनारपट्टीवर चाच्यांपासून सुटका केली होती.
Indian Navy rescues Bangladeshi ship.
Indian Navy rescues Bangladeshi ship.Esakal
Updated on

Indian Navy rescues Bangladeshi ship:

समुद्री चाचे सातत्याने मालवाहू जहाजाला लक्ष्य करत आहेत. अशातच हिंदी महासागरात यावेळी त्यांनी एमव्ही अब्दुल्ला या बांगलादेशी मालवाहू जहाजाचे अपहरण केले होते. सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून 600 मैल पूर्वेला ही घटना घडली.

हे जहाज मोझांबिकमधील मापुटो बंदरातून संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अल हमरिया बंदराकडे जात होते. ज्यामध्ये सुमारे 58 हजार टन कोळसा होता.

दरम्यान या घटनेची माहिती भारतीय नौदलाला कळाल्यानंतर तात्काळ प्रतिसाद देत, आपली युद्धनौका आणि एक लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान (LRMP) तैनात केले आणि त्याची सुटका केली.

भारतीय नौदल मिशनने एमव्ही अब्दुल्ला जहाजावरील समुद्री चाच्यांच्या हल्ल्याला एक युद्धनौका आणि एलआरएमपी तैनात करून प्रत्युत्तर दिले, असे नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, LRMP ताबडतोब तैनात करण्यात आले आणि 12 मार्चला संध्याकाळी, जहाजातील चालक दलातील सदस्यांचे लोकेशन शोधण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला जहाजाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पण अथक प्रयत्नांनंतर भारतीय नौदलाच्या तैनात युद्धनौकेने अपहरण केलेल्या व्यापारी जहाजाला अडवले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धनौकेने 14 मार्च रोजी सकाळी बांगलादेशी जहाज यशस्वीरित्या रोखले.

Indian Navy rescues Bangladeshi ship.
Bharat Jodo : तपास यंत्रणांचा वापर करून खंडणी उकळण्याचे रॅकेट; गांधींचा गंभीर आरोप

हे बांगलादेशी जहाज रोखल्यानंतर अपहृत क्रू मेंबर्सची (सर्व बांगलादेशी नागरिक) सुटका करण्यात आली आणि सोमालियाच्या प्रादेशिक पाण्यात पोहोचेपर्यंत युद्धनौका एमव्ही अब्दुल्ला जहाजाच्या जवळच होती.

अल जझीर या वृत्त संकेतस्थळाने सागरी सुरक्षा फर्म एम्ब्रेच्या हवाल्याने म्हटले आहे की, ही घटना सोमालियाची राजधानी मोगादिशूच्या पूर्वेला सुमारे 600 समुद्री मैल (1,111 किमी) हिंद महासागरात घडली आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, डिसेंबरपासून सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. तसेच येमेनच्या हुथी बंडखोरांनी सुरू केलेल्या जहाजावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

Indian Navy rescues Bangladeshi ship.
Russian Presidential Elections : पुतीन यांचा एकतर्फी विजय निश्‍चित! तीन दिवस चालणार मतदान प्रक्रिया

गेल्या काही आठवड्यांमध्ये, भारतीय नौदलाने पश्चिम हिंदी महासागरातील अनेक व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यात मदत केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला नौदलाने 11 इराणी आणि आठ पाकिस्तानी नागरिकांच्या क्रूची सोमालियाच्या पूर्व किनारपट्टीवर चाच्यांपासून सुटका केली होती.

जानेवारीत आयएनएस सुमित्रा या नौदलाच्या युद्धनौकेने सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर पाकिस्तानी नौकेतील १९ जणांची सुटका केली होती.

नौदलाने ५ जानेवारी रोजी उत्तर अरबी समुद्रात एमव्ही लीला नॉरफोक या लायबेरियन ध्वजांकित जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता आणि सर्व क्रू मेंबर्सची सुटका केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()