पाकमध्ये मंदिरावर हल्ला; जन्माष्टमीलाच कृष्णाची मूर्ती तोडली

pakistan
pakistan
Updated on
Summary

पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समुदाय सोमवारी भगवान कृष्णाचा जन्मोत्सव आनंदात साजरा करत होता

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समुदाय सोमवारी भगवान कृष्णाचा जन्मोत्सव आनंदात साजरा करत होता. त्याचवेळी सिंध प्रांतातील संघार जिल्ह्यात जमावाने एका हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे. काही उपद्रवी लोकांनी भगवान कृष्णाची मूर्ती तोडली आहे. पाकिस्तानच्या संसदेचे सदस्य लाल मल्ही यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. मल्ही यांनी मंदिर अपवित्र करण्यासाठी आणि मूर्तीची तोडफोड करण्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. (International Latest News)

लाल मल्ही यांनी मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांना टॅक करत म्हटलंय की, 'खिप्रो-सिंधमध्ये मंदिर अपवित्र करण्याच्या आणि भगवान श्री कृष्णाची मूर्ती तोडल्याच्या घटनेची मी निंदा करतो. मंदिर आणि देवी-देवतांवर वारंवार हल्ले होत आहेत. याला थांबवण्यासाठी कायदा करणाऱ्या लोकांनी कारवाई करायला हवी.'

pakistan
अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताच तालिबानची आतशबाजी

पाकिस्तानचे कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. जेव्हा लोक कृष्ण जन्माष्टमी साजरा करत होते तेव्हा सर्व हिंदू देवी-देवतांच्या अपमानाच्या उद्देशाने खिप्रो सिंधमध्ये एका हिंदू मंदिराची तोडफाड केली गेली. पाकिस्तानमध्ये इस्लाम विरोधात ईशनिंदाच्या विरोधात खोटा आरोप करण्यात आला तरीही मॉब लिंचिंग किंवा मृत्यूची शिक्षा दिली जाते. पण, बिगर मुस्लीम देवी-देवतांच्या विरोधात झालेल्या कोणत्याही कृतीवर कारवाई केली जात नाही.

सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत. यात भगवान कृष्णाच्या मूर्तीची तोडफोड झाल्याचं दिसत आहेत. मूर्तीचे अनेक भाग तुटलेले दिसताहेत. विशेष म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीला पंजाब प्रांतामध्ये रहीमयार खान जिल्ह्यात भोंग शहरामध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली. चार ऑगस्टला जमावाने शहरातील गणेश मंदिराची तोडफोड केली होती. अनेक देवतांच्या मूर्त्या तोडल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.