Elon Musk नी दिले नवे संकेत; Twitter आणि Tesla यांचं विलिनीकरण होण्याची शक्यता

टेस्लाचे मालक एलॉन मस्क सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत.
Elon Musk
Elon Musk esakal
Updated on
Summary

टेस्लाचे मालक एलॉन मस्क सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत.

मस्क कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. आता आणखी एका मुद्द्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेच येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून टेस्ला (Tesla) आणि ट्विटर (Twitter) यांचं विलिनीकरण होणार का असा प्रश्न उपस्थित होतं आहे. दरम्यान, आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या नवीन ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

टेस्लाचे मालक एलॉन मस्क सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार रद्द (Twitter Deal) केल्याचं प्रकरण बरेच चर्चेत राहीलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतची 44 अब्ज कोटींची डील रद्द केली आहे. पण या दरम्यान एलॉन मस्क यांनी 30 जुलै रोजी केलेल्या एका ट्विटने सर्वांना संभ्रमात टाकलं आहे. मस्क यांचं ट्विट पाहून टेस्ला आणि ट्विटर यांचं विलिनीकरण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Elon Musk
एकीकडे राऊत ईडीच्या ताब्यात तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंवर पुष्पवृष्टी

एलॉन मस्क यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात की, 'टेस्ला + ट्विटर -> ट्विझलर.' आता एलॉन मस्क यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. टेस्ला आणि ट्विटर लवकरच विलीन होणार आहेत, असे अनेकांना वाटतं आहे. एलॉन मस्क यांचे ट्विट हेच संकेत देत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, ट्विटरसोबतचा 44 अब्ज डॉलर्सचा करार रद्द केल्याबद्दल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कच्या विरोधात ट्विटरने कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. आता 17 ऑक्टोबरपासून दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू होणार आहे. या हायप्रोफाईलच्या खटल्यासाठी अमेरिकन न्यायाधीशांनी तारीख निश्चित केली आहे.

Elon Musk
Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये डबल गोल्ड धमका; जेरेमी लालरिनुंगाने जिंकले सुवर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.