Hiroshima Day: 1 लाख लोकांचा जीव घेणारा 'लिटल बॉय'

Hiroshima Day
Hiroshima Day
Updated on
Summary

जगभरात ६ ऑगस्ट हिरोशीमा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस इतिहासातील काळ्या दिवसांपैकी एक आहे. याच दिवशी जपानच्या हिरोशीमा शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता.

नवी दिल्ली- जगभरात ६ ऑगस्ट हिरोशीमा (Hiroshima Day) दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस इतिहासातील काळ्या दिवसांपैकी एक आहे. याच दिवशी जपानच्या हिरोशीमा शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. यात चुटकीसरशी 1 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाचा अंत या घटनेमुळे झाला. जपानवरील या हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. अणुबॉम्बचा वापर किती भयानक असू शकतो हे राजकीय नेत्यांना कळणं अपेक्षित होतं, पण आजही अनेक देश अण्वस्त्र निर्मितीच्या कामाला लागले आहेत. (International Latest Marathi News)

जपानला नमवण्यासाठी अमेरिकेने मॅनहॅटन प्रोजेक्ट राबवला. याअंतर्गत दोन अणुबॉम्ब तयार करण्यात आले होते. यातील पहिल्या बॉम्बचे नाव होते 'लिटल बॉय' (The Little Boy) जो हिरोशीमावर टाकण्यात आला. दुसऱ्या बॉम्बचे नाव होते 'फॅट मॅन' (The Fat Man) जो नागासाकीवर टाकण्यात आला. हिरोशीमाने अत्यंक भयावह परिस्थितीचा सामना केला. जागेवर जवळपास ४० टक्के लोकसंख्या नाहीशी झाली होती. ९० हजार ते १ लाख ४० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. यात प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता.

Hiroshima Day
१०२ व्या घटनादुरुस्तीचा अर्धवट निर्णय भाजपाच्या नेत्यांना पटला आहे का? - शिवसेना

अणुबॉम्ब आणि त्याचा युद्धातील वापर किती नुकसान करु शकतो हे जगानं पाहिलं. दोन शहरे पूर्णपणे उद्धवस्त झाली. दुर्घटनेनंतरही हिरोशीमा आणि नागासाकी शहराला अणुबॉम्बच्या झळा सोसावल्या लागत आहेत. उत्सर्जित किरणांमुळे अनेक मुलं कायमची अधु झाली. आजही त्याचा प्रभाव नव्याने जन्मलेल्या मुलांवर पाहायला मिळतो. अनेकांना कँसरसह इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. तरीही आज अनेक देशांनी अणुबॉम्ब बाळगले आहेत. माहितीनुसार, जगात सध्या १३ हजारांपेक्षा अधिक अणु शस्त्र आहेत. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, इस्त्रायल, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या देशांनी आतापर्यंत आण्विक चाचण्या केल्या आहेत.

Hiroshima Day
'बिनधास्त लोकलने प्रवास करा'; भाजपचे आंदोलन तीव्र

कोणत्या देशाकडे किती आहे अण्वस्त्र?

१. रशिया- 6800 अण्वस्त्र

२. अमेरिका- 6600 अण्वस्त्र

३. भारत- 120-130 अण्वस्त्र

४. चीन- 270 अण्वस्त्र

५. पाकिस्तान : 130-140 अण्वस्त्र

६. फ्रान्स-300 अण्वस्त्र

७. ब्रिटन- 215 अण्वस्त्र

८. इस्त्रायल- 80 अण्वस्त्र

९. उत्तर कोरिया : 10-20 अण्वस्त्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()