Chandrayaan-3: 'भारताकडून ऐतिहासिक कामगिरी'; पाकिस्तानकडूनही चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा

Chandrayaan-3: 'भारताकडून ऐतिहासिक कामगिरी'; पाकिस्तानकडूनही चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा
Updated on

Pak Ex Minister Praises Chandrayaan 3 Mission moon landing today

नवी दिल्ली- भारताचे चांद्रयान-३ आज सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटाला चंद्रावर उतरणार आहे. या मोहिमेकडे केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण, भारताने चंद्रावर यान उतरवले तर दक्षिण चंद्रावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.त्यामुळे यान यशस्वीपणे चंद्रावर उतरेल यासाठी सर्व देश प्रार्थना करत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडूनही भारताला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री फवाद शेख यांनी भारताच्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहे. इम्रान सरकारमध्ये त्यांच्याकडे माहिती आणि दूरसंचार मंत्रीपद होतं. त्यांनी म्हटलं की पाकिस्तान मीडियाने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण करायला हवे. त्यांनी भारतीय वैज्ञानिक आणि अवकाश संबंधित कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच भारताची मोहीम मानवजातीसाठी एतिहासिक असल्याचं ते म्हणाले.

Chandrayaan-3: 'भारताकडून ऐतिहासिक कामगिरी'; पाकिस्तानकडूनही चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा
Chandrayaan-3 : भारत ऐतिहासिक वळणावर; ‘चांद्रयान-३’च्या यशासाठी देशभरात प्रार्थना

फवाद शेख यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. पाकिस्तानने बुधवारी चांद्रयानचे चंद्रावर होणारे लँडिग लाईव्ह दाखवायला हवे. हा मानवजातीसाठी ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन. खुप शुभेच्छा, असं ते म्हणाले आहेत. भारताच्या मोहिमेसाठी जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे. अमेरिकी संशोधन संस्था नासाने भारताचे चांद्रयान-३ प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

Chandrayaan-3: 'भारताकडून ऐतिहासिक कामगिरी'; पाकिस्तानकडूनही चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा
Sakal Podcast : चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार ते कांद्याचा दर शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार का?

२० मिनिटे महत्त्वाचे

भारतीय वेळेनुसार चांद्रयान ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरेल. भारतामध्ये याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचण्याच्या काही क्षण आधी क्रॅश झाले होते. त्यामुळे आता चांद्रयान-३ कडून भारताला फार अपेक्षा आहेत. देशभरात यान यशस्नीरीत्या उतरावे यासाठी पूजा-अर्चा केली जात आहे. अनेक जण प्रार्थना करत आहेत. यानासाठी २० मिनिटे फार महत्वाचे असणार आहेत. यानाने हा टप्पा पार केल्यास त्याचे चंद्रावर यशस्वीरीत्या लँडिग होईल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.