वॉर्सा : जगातील कोणत्याही संघर्षावर तोडगा युद्धभूमीवर मिळू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ठामपणे सांगितले. तसेच, युरोपात शांतता आणि स्थैर्य पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचेही मोदी यांनी त्यांच्या पोलंड दौऱ्यावेळी जाहीर केले. युक्रेन दौऱ्याच्या एक दिवस आधी त्यांनी हे विधान करत या दौऱ्यातील आपली भूमिकाच स्पष्ट केली असल्याचे मानले जात आहे.