उद्योगपती एलॉन मस्क यांनी नुकतंच ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटर खरेदी केलं. कंपनीकडे मोठ्या प्रमाणात क्षमता असून ही क्षमता आपण वापरात आणू असंही मस्क म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्विटर आता चांगलंच चर्चेत आलेलं नाही. त्या अनुषंगाने ट्विटरचा इतिहास, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची आत्तापर्यंतची वाटचाल...या सगळ्याविषयी थोडक्यात जाणून घ्या...
ट्विटरचा इतिहास
ट्विटर ही एक मायक्रोब्लॉगिंग सेवा आहे. ट्विटरचा उदय ओडिओ या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झाला आहे. हा प्लॅटफॉर्म २००४ मध्ये एवान विल्यम्स, बिझ स्टोन, नोआह ग्लास यांनी सुरू केला होता. स्टोन पूर्वी गुगलमध्ये काम करत होते, विल्यम्स हे प्रसिद्ध ब्लॉगिंग साईट ब्लॉगरचे संस्थापक आहेत. अॅपलने २००५ मध्ये जाहीर केलं की ते itunes हा आपा पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म सुरू करत आहेत आणि त्यानंतर आपली कंपनी अॅपलसोबत स्पर्धा करू शकणार नाही, असं वाटून ओडिओच्या नेतृत्वाने नवी दिशा शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ओडिओच्या कर्मचाऱ्यांकडून नव्या संकल्पनाही मागवल्या. त्यावेळी जॅक डॉर्सी नावाच्या अभियंत्याने छोटे मेसेजेस पाठवण्यासाठी ब्लॉगसारखा एखादा प्लॅटफॉर्म सुरू करण्याची कल्पना पुढे ठेवली.
twttr झालं Twitter
ग्लास यांनी याचं नाव twttr असं सुचवलं. तर २१ मार्च २००६ रोजी डॉर्सी यांनी just setting up my twttr असं पहिलं ट्विट केलं आणि त्यानंतर अखेर जुलै २००६ मध्ये ट्विटरचा उदय झाला. डॉर्सी हे ट्विटरचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) बनले. २००८ मध्ये विल्यम्स यांनी डॉर्सी यांना या पदावरून हटवलं आणि त्यानंतर चिफ ऑपरेटिंग ऑफिसर डिक कोस्टोलो यांनी विल्यम्स यांना त्यांच्या जागी नियुक्त केलं.
सुरूवातीला ट्विटर केवळ मोफत मेसेजिंग प्लॅटफॉर्म होता, पण त्यामध्ये उत्पन्नाचा काही मार्ग नव्हता. त्यामुळे एप्रिल २०१० पासून ट्विटरने Promoted Tweets म्हणजे अशा जाहिराती ज्या सर्च रिझल्ट्समध्ये दिसतील. त्यानंतर त्यांनी Promoted Trends, Accountsचीही सुरूवात केली आणि त्यातून त्यांना उत्पन्न मिळू लागलं.
Twitter एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
ट्विटर एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून तेव्हा उदयाला आलं जेव्हा अभिनेता अॅश्टन कचर हा पहिला ट्विटर युजर ठरला, ज्याचे लाखो फॉलोवर्स आहेत. त्यानंतर विविध कार्यक्रम, सभा, राजकीय सभा यांच्यासाठी ट्विटरचा वापर संवादाचं एक माध्यम म्हणून करण्यास सुरूवात झाली. २००८ मध्ये अमेरीकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान बराक ओबामा यांनी आपले विरोधक जॉन मेककेन यांना सोशल मीडियावरही प्रभावित केलं. ओबामा यांचे ट्विटरचे फॉलोवर्स हे मेककेन यांच्या फॉलोवर्सच्या तुलनेत २० पट अधिक होते. यामुळे निवडणुकीच्या रणनीतीमध्ये सोशल मीडियाच्या वापराची सुरूवात झाली.
हैतीमधील मोठा भूकंप, रशिया आणि जॉर्जियामधील संघर्ष, इराण निवडणूक या सगळ्या गोष्टींमुळे पुढे ट्विटर हे माहिती प्रसारणाचं एक महत्त्वाचं माध्यम बनलं. हैतीमधल्या भूकंपाच्या वेळी अनेकांनी नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठीचे ट्विट्स केले, अनेकांनी ते फॉलो केले आणि फंड जमा करण्यात आले.
त्यानंतर सप्टेंबर २०१३ मध्ये ट्विटरने आपण एक सार्वजनिक कंपनी असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या IPO ने नोव्हेंबर महिन्यामध्ये १.८ अब्ज डॉलर्स जमवले, ज्याची परतावा किंमत मिळाली ३१ अब्ज डॉलर्स.
आता डॉर्सी ऑक्टोबर २०१५ मध्ये पुन्हा एकदा सीईओपदी आले. आता ट्विटरची लोकप्रियता वाढत होती, मात्र अद्याप त्यातून फायदा असा होत नव्हता. म्हणून मग त्याच्या फीचर्समध्ये वाढ करण्यात आली Moments हे फीचर आणण्यात आलं जे आता Explore म्हणून ओळखलं जातं.
ट्विटरमधून कंपनीचा फायदा होण्यास सुरूवात २०१७ च्या अखेरीस झाली, जेव्हा ट्विटरच्या दर महिन्याच्या युजर्सची संख्या ३३० मिलियनपर्यंत पोहोचली. २०१९ च्या सुरूवातील ट्विटरने दर महिन्याच्या युजर्सऐवजी, प्रत्येक दिवशी किती युजर्सपर्यंत जाहिराती पोहोचल्या (Monetizable daily active users), त्या संख्येवर लक्ष केंद्रित केलं. २०२१ च्या अखेरपर्यंत ट्विटरकडे उत्पन्न मिळवून देतील असे २१७ मिलियन युजर्स होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये डॉर्सी आपल्या पदावरून पुन्हा एकदा पायउतार झाले आणि त्यांची जागा घेतली पराग अग्रवाल यांनी.
आणि आता २०२२ मध्ये एलॉन मस्क या दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या अमेरिकी उद्योगपतीने ४४ अब्ज डॉलर्स किमतीला ट्विटर खरेदी केला. ज्यामुळे आता एलॉन या कंपनीचा एकमेव मालक बनणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.