एक घोडा चालत्या ट्रेन आणि उभ्या असणाऱ्या ट्रेनच्या मध्ये सरपटताना दिसतो आहे. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यांना भिती वाटते त्यांनी हा व्हिडिओ न पाहिलेला बरा. महत्वाचे म्हणजे हा घोडा वाचला असून तो सुरक्षित आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ इजिप्तचा आहे. चालत्या ट्रेनच्या शेजारी एक घोडा धावत असताना प्रवाशांना भितीच वाटली. चालती ट्रेन आणि थांबलेल्या ट्रेनमधून अरुंद जागेतून घोडा पळून गेला. मात्र, तो थोडक्यात पळून जाण्यात यशस्वी झाला. घोडा सुखरूप बाहेर पडल्याचे पाहून प्रवाश्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तो आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ विषयी दीपांशु काबरा म्हणाले की घोडा दोन ट्रेनच्या मध्ये फसला. त्याला पळता येत होते. तो मार्ग न बदलता धावत होता. शेवटी बाहेर आला. या व्हिडिओमधून धडा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अडचणीत अडकून विचलित होऊ नका, फक्त स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहा, असे त्या घोड्याला सांगायचे असावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.