लाहोर : कोरोना काळात संपूर्ण जगच वेठीला धरलं गेलंय तिथं पाकिस्तानसारख्या देशाची काय अवस्था असेल, याची कल्पना न केलेलीच बरी! सध्या संपूर्ण जगातल्या देशांमधील आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आहे. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधून समोर आलेली ही घटना ऐकून तुम्ही शंभर टक्के हैराण व्हाल, यात शंका नाही. पाकिस्तानमधील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने नव्हे तर चक्क एका सिक्योरिटी गार्डने सर्जरी केली आहे. बसला ना धक्का? मात्र, हे खरंय! (Hospital patient in pakistan dies after security guard performs surgery hindi)
पाकिस्तानमधील 'सामना' या चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, लाहोरमधील मेयो हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. या हॉस्पिटलमधील सिक्योरिटी गार्डने एका महिलेचं ऑपरेशन केलं आहे. या ऑपरेशननंतर काही दिवसांतच त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. 80 वर्षांच्या या महिलेचं ऑपरेशन करण्याचं हे धाडस हॉस्पिटलमध्ये आधी काम करणाऱ्या सिक्योरिटी गार्डने दाखवलं आहे. मृत महिलेचं नाव शमीमा बेगम असं असून तिला पाठीवर झालेल्या जखमेमुळे सर्जरी करण्याची आवश्यकता होती. मात्र, ही सर्जरी कुणा तज्ज्ञ डॉक्टरऐवजी मुहम्मद वाहिद बट नावाच्या एका सिक्योरिटी गार्डने केली होती.
हे चित्रविचित्र प्रकरण घडल्यानंतर तिथे आता तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र, हॉस्पिटलने या घटनेबाबत पूर्णपणे मूग गिळले आहे. मेयो हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने आपलं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर म्हटलंय की, हे एक मोठं हॉस्पिटल आहे. अशा ठिकाणी प्रत्येक वेळी कोण काय करतो आहे, यावर नजर ठेवणं तितकंस सोपं नाहीये. ही गोष्ट अद्याप नीटपणे स्पष्ट झाली नाहीये की, ऑपरेशन थिएटरमध्ये सिक्योरिटी गार्डने ही सर्जरी कशी केली. मात्र, अशी माहिती मिळाली आहे की, त्याचवेळी एक क्वालिफाईड टेक्निशियन देखील उपस्थित होता.
मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी या ऑपरेशनसाठी मोठी रक्कम दिली होती. या ऑपरेशन नंतर झालेल्या जखमेवर मलमपट्टी करायला हा सिक्योरिटी गार्ड त्या महिलेच्या घरी देखील गेला होता. मात्र, जेंव्हा जखमेचं ब्लिडींग थांबलं नाही आणि त्यांच्या वेदना असह्य झाल्या तेंव्हा त्या वयस्कर महिलेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे त्यांना कळालं की, नेमका घोळ काय झाला आहे. सध्या लाहोर पोलिसांनी त्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करवून घेतलं आहे तसेच या प्रकरणाचा ते तपास करत आहे.
मेयो हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं की, सर्जरी करणारा आरोपी सिक्योरिटी गार्डला दोन वर्षांपूर्वी रुग्णांकडून जबरदस्ती पैसे वसूलण्याच्या प्रयत्नांमुळे हाकलण्यात आलं होतं. तसेच इतरही अनेक बाबी समोर आल्या होत्या ज्यामध्ये बेजबाबदारपणा समोर आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.