काबूल : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैनिकांची देशवापसी सुरू झाल्यानंतर तालिबानने एकामागून एक प्रांत काबीज केले आणि रविवारी काबूलवर धडक मारली. एवढेच नाही तर अध्यक्षीय प्रासादावरही ताबा मिळवला. या घटनेबाबत पाश्चिमात्य देशांतील वृत्तपत्राचे मुखपृष्ठ तालिबानच्या वृत्तांनी भरून गेले. ‘पश्चिमेचे पलायन अन देश तालिबानच्या ताब्यात’ अशा शब्दांत काबूल पाडावचे वर्णन केले आहे. जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी तालिबानच्या काबूलवरील ताबा मिळवण्याच्या घटनांना प्रमुख स्थान दिले आहे. कारण अस्थिरतेच्या काळात तेथील सरकार कोसळले आहे. अध्यक्षांनी देशातून पळ काढला आहे.
द टेलिग्राफच्या मते, दहशतवादी संघटनेने २००१ रोजी मित्र राष्ट्रांच्या हल्ल्यात गमावलेला प्रांत मिळवण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी काळात शहरावर ताबा मिळवला आणि सरकारची सूत्रे हाती घेतली. द गार्डियनने म्हटले की, अफगाणिस्तानात वीस वर्षापासून सुरू असलेली ‘पश्चिम देशांची मोहीम’ एकाच दिवसात नाट्यमय घडामोडीतून कोलमडून पडली. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी हे देश सोडून पळून गेले आणि अमेरिकी राजदूत हे दूतावास कार्यालय सोडून विमानतळावर आले. ‘फायनान्शियल टाइम्स’ ने म्हटले की, काबूलच्या विमानतळावर भीतीदायक दृश्य आहे.
कारण भयभीत नागरिक अफगाणिस्तानातून बाहेर जाण्यासाठी धडपड करत आहेत आणि अमेरिका दूतावासाने देशातील सुरक्षा व्यवस्था ढासळल्याचा इशारा दिला आहे. काबुलमधला तालिबानमधला प्रवेश हा युद्धाचा शेवट होता. या दहशतवादी गटाला अफगाणिस्तानात खूपच कमी विरोध झाला. ‘एस्केप फ्रॉम काबूल असा ‘सन’ ने मथळा दिला आहे. वृत्तपत्राच्या मते, ब्रिटन आणि अमेरिकी नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्याची योजना आखल्यानंतर रविवारी रात्री ब्रिटनच्या नागरिकांच्या एअरलिफ्टची कारवाई सुरू झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.