Easter Date : शिवजयंतीच्या तारखेप्रमाणे ईस्टरच्या तारखेबाबतही आहेत मतभेद; या २ दिवशी आहे ईस्टर

ईस्टरची तारीख दर काही वर्षांनी बदलत असते. आज आपण ईस्टरची तारीख ठरवण्याच्या पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत.
Easter Date
Easter Date google
Updated on

मुंबई : गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्तांचा सुळावर मृत्यू झाला. त्यानंतरच्या रविवारी ते पुन्हा जिवंत झाले, अशी ख्रिश्चन धर्मियांची धारणा आहे. त्यामुळे या दिवशी ईस्टर डे साजरा केला जातो.

ईस्टरची तारीख दर काही वर्षांनी बदलत असते. आज आपण ईस्टरची तारीख ठरवण्याच्या पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत. (how is the easter date is decided what is easter) हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Easter Date
Heart Emoji : हृदयाचा आकार वेगळाच असताना 'लाल दिल' हे हृदयाचं प्रतीक कसं बनलं ?

इस्टर संडे नेहमी पाश्चाल पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी येतो. पाश्चल पौर्णिमा म्हणजे काय ? हा विशेषतः पौर्णिमेनंतरचा पहिला रविवार आहे जो मार्च किंवा वसंत ऋतूच्या मध्यानंतर येतो.

ख्रिसमस सौर कॅलेंडरवर निश्चित केला जातो. इस्टर ज्यू कॅलेंडरच्या चंद्र चक्रावर आधारित असतो. चंद्र महिना २९.५ दिवसांचा असल्याने ईस्टरची तारीख बदलू शकते.

येशूने त्याच्या वधस्तंभावर जाण्याआधी आपले प्रेषितांसोबत ज्या दिवशी जेवण केले होते त्याला पॅसोव्हर सण म्हटले जाते.

ही बाब सुलभ करण्यासाठी ख्रिश्चन चर्चद्वारे वापरल्या जाणार्‍या वसंत ऋतुच्या मध्याची म्हणजेच विषुववृत्ताची तारीख नेहमी २१ मार्च असते. खरं तर, ऋतूच्या मध्याची खगोलशास्त्रीय तारीख एक किंवा त्याहून अधिक दिवसांनी बदलू शकते.

Easter Date
Hambirrav Mohite : सोयराबाईंचे भाऊ असूनही हंबीररावांनी संभाजी महाराजांना साथ का दिली ?

यावर्षीचा इस्टर २०२३ कधी आहे ?

२०२३ मध्ये, विषुववृत्ताची खगोलीय तारीख सोमवार, २० मार्च आहे. त्यामुळे याला "ecclesiastical" (म्हणजे चर्चद्वारे वापरलेली तारीख) म्हटले जाते.

यावर्षी, इस्टर संडे रविवारी, ९ एप्रिल रोजी साजरा केला जाईल. हे ग्रेगोरियन कॅलेंडरवर आधारित आहे. अनेक पूर्वेकडील ऑर्थोडॉक्स चर्च ग्रेगोरियन ऐवजी ज्युलियन कॅलेंडरचे अनुसरण करतात. २०२३ मध्ये, इस्टर्न ऑर्थोडॉक्स इस्टर रविवारी, १६ एप्रिल रोजी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.