How To Control Husband : नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं? ही महिला चक्क चालवते ऑनलाईन क्लास

एक महिला पार्टनरला कंट्रोल कसं करायचं, याचे ऑनलाईन क्लासद्वारे धडे देते
How To Control Husband
How To Control Husbandsakal
Updated on

सध्या या ऑनलाईनच्या जगात सर्वच ऑनलाईन झालंय. त्यात विविध प्रकारचे कोर्स असो की शिकवणी वर्ग, सर्वकाही तुम्ही घरबसल्या शिकू शकता. असाच एक ऑनलाईन क्लास सध्या चर्चेचा विषय ठरलाय. कारण हा ऑनलाईन क्लास कोणत्या विशिष्ट विषयाचा नाही तर नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं, हे शिकवणारा क्लास आहे.

हो, तुम्हाला आश्चर्च वाटेल पण एक महिला पार्टनरला कंट्रोल कसं करायचं, याचे ऑनलाईन क्लासद्वारे धडे देते. (How To Control Husband a woman teach online class and earn money )

अनेक बायकांची तक्रार असते की त्यांचा पार्टनर म्हणजेच नवरा किंवा बॉयफ्रेंड त्याचं ऐकत नाही. प्रत्येक स्त्रिला तिच्या नवरा किंवा बॉयफ्रेंडनी तिचं ऐकावं, असं वाटतं. त्यामुळे नवऱ्याला कसं कंट्रोल करावं किंवा नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं, हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक स्त्रिची असते. यासाठी एक महिला ऑनलाईन क्लास घेत इतर महिलांना हे सर्व शिकवते आणि एवढंच काय तर त्यांच्याकडून फीसुद्धा चार्ज करते.

मारग्रीटा नजॅरेंका असं या महिलेचं नाव असून ती ऑस्ट्रेलियातील सिडनीची रहीवासी आहे. ती तिच्या ऑनलाईन क्लासद्वारे इतर महिलांना पुरुषांना आपल्या कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं, याविषयी मार्गदर्शन करते. तिच्या मते भांडण न करता पुरुषांना अधिक चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येतं.

How To Control Husband
Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा

मारग्रीटाचा ऑनलाईन क्लास सध्या सोशल मीडियावर चर्चेचा आहे. महिलांना तर या अनोख्या क्लासचं वेड लागलंय. अनेक नेटकरी यावर वेगेवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()