दहा कोटी लोकसंख्येच्या 'या' देशात कोरोनाचा एकही मृत्यू नाही; अशी केली मात

How Vietnam managed to keep its coronavirus death toll at zero
How Vietnam managed to keep its coronavirus death toll at zero
Updated on

हनोई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं असताना चीनला लागून असलेल्या व्हिएतनामध्ये मात्र कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. संकटाच्या या काळातही व्हिएतनामने आपल्या नागरिकांना कोरोनापासून वाचवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे व्हिएतनामध्ये आरोग्य सुविधाही फारशा चांगल्या नाहीत, तरीही योग्य उपाययोजना करून इकडे कोरोनावर मात करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

व्हिएतनाम या देशाची लोकसंख्या ९७ मिलियन म्हणजेच ९.७ कोटी एवढी आहे. शनिवारपर्यंत व्हिएतनाममध्ये कोरोनाचे फक्त ३२८ रुग्ण आहेत. व्हिएतनाम या देशाची मोठी सीमा चीनला लागून आहे, तरीही त्यांनी कोरोनाला मात दिली आहे. तसेच देशाचं उत्पन्नही निम्न-मध्य आहे. वर्ल्ड बँकेच्या माहितीनुसार व्हिएतनाममध्ये प्रत्येक १० हजार लोकांमागे एक डॉक्टर आहे. 

अशी केली कोरोनावर मात
जानेवारीच्या सुरुवातीलाच हनोईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर वुहानमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. ज्या प्रवाशांना ताप आल्याचं आढळलं त्यांना वेगळं ठेवण्यात आलं. जानेवारीच्या मध्यात उपपंतप्रधान वु डक डॅम यांनी कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांना कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले. कोरोनाशी लढणं म्हणजे शत्रूशी लढण्यासारखं आहे, असं पंतप्रधान २७ जानेवारीला झालेल्या कम्यूनिस्ट पार्टीच्या बैठकीत म्हणाले. तीन दिवसांमध्येच त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय संचालन समितीची स्थापना केली. त्याचदिवशी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायररस ही जागतिक आणीबाणी असल्याचं घोषित केलं.
-------
दिल्लीतील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे संचालक कोरोना पॉझिटिव्ह
-------
...अखेर स्पेस एक्सचे रॉकेट अवकाशात झेपावले
-------
ती आमची चुकच : अमित शाहांची कबुली
--------
१ फेब्रुवारीला जेव्हा व्हिएतनाममध्ये कोरोनाचे ६ रुग्ण आढळले, तेव्हा व्हिएतनाम आणि चीनमधल्या सगळ्या विमानसेवा थांबवण्यात आल्या. यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनच्या नागरिकांचा व्हिसाही रद्द करण्यात आला. मार्चच्या शेवटी व्हिएतनामने सगळ्या परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.