BBC Modi Documentary: भारतात बॅन, पण अमेरिकेत दाखवली जाणार BBC ची डॉक्युमेंटरी; पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच...

यासाठी कित्येक पत्रकार, पॉलिसी मेकर्स आणि विश्लेषकांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
BBC Modi Documentary Screening
BBC Modi Documentary ScreeningeSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांमध्येच अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच अमेरिकेतील दोन मानवाधिकार संघटनांनी तिथे बीबीसीच्या मोदींवरील डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग ठेवलं आहे. २० जून रोजी हा माहितीपट दाखवला जाईल. यासाठी कित्येक पत्रकार, पॉलिसी मेकर्स आणि विश्लेषकांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

ह्युमन राईट्स वॉच (Human Rights Watch) आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल (Amnesty International) या दोन मानवाधिकार संघटनांनी हे स्क्रीनिंग आयोजित केलं आहे. अमेरिकेतील वॉशिंग्नट शहरात हे खासगी स्क्रीनिंग ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या केवळ दोन दिवस आधी हे स्क्रीनिंग ठेवण्यात आलंय. याबाबत घोषणा केल्यानंतर ह्युमन राईट्स वॉचने बीबीसीची मोदींवरील डॉक्युमेंटरी (BBC Documentary) ही भारतात बॅन करण्यात आल्याची आठवण करून दिली.

काय आहे ही डॉक्युमेंटरी?

'इंडिया : दि मोदी क्वेश्चन' (India : The Modi Question) ही दोन भागांची डॉक्यमेंटरी सीरीज आहे. २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या हिंसक दंगलींदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मोदींनी केलेल्या कारवाईबाबत यात प्रश्न उपस्थित केले आहेत. या दंगलींमध्ये सुमारे १००० लोकांचा बळी गेला होता, ज्यांपैकी बहुतांश मुस्लिम होते.

BBC Modi Documentary Screening
PM Modi BBC Documentary : मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीविरोधात विधानसभेत ठराव मंजूर

काय होतं प्रकरण

गुजरातमध्ये २००२ साली रेल्वेच्या डब्याला लागलेल्या आगीत ६० हिंदू भाविकांचा मृत्यू झाला होता. या आगीचं कारण अस्पष्ट असलं, तरी यासाठी मुस्लिम समुदायाला जबाबदार ठरवण्यात आलं होतं. यानंतर हिंदु समुदायातील लोक रस्त्यावर उतरले होते, आणि भीषण हिंसक पद्धतीने मुस्लिम विरोधी आंदोलन सुरू झालं होतं.

मोदींवरील आरोप

या हिंसक आंदोलनात हिंदू समुदायांना सरकारने अधिक चिथावले, तसंच त्यांना सूट देण्यासाठी पोलिसांना आदेश दिल्याचे आरोप करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून या सगळ्यासाठी नरेंद्र मोदी थेट जबाबदार असल्याचं या डॉक्युमेंटरीमध्ये म्हटलं आहे.

BBC Modi Documentary Screening
BBC चे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी दिला राजीनामा; बोरिस जॉन्सन यांच्यामुळे आले अडचणीत

निर्दोष मुक्तता

नरेंद्र मोदींवरील या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका एसआयटीची स्थापना केली होती. २०१२ मध्ये या एसआयटीने मोदींची या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. २०२२ मध्ये हा निर्णय योग्य असल्याचं म्हणत कायम ठेवण्यात आला. दरम्यान, या आरोपांमुळे मोदींच्या यूएस व्हिसावर बॅन लागू करण्यात आला होता. २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर हा बॅन मागे घेण्यात आला.

भारतात डॉक्युमेंटरी बॅन

बीबीसीने तयार केलेली ही डॉक्युमेंटरी यावर्षी जानेवारीमध्ये रिलीज करण्यात आली होती. ही डॉक्युमेंटरी एकतर्फी आणि प्रपोगंडा पसरवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे, असं भारत सरकारने म्हटलं होतं. यामुळे ही डॉक्युमेंटरी भारतात बॅन करण्यात आली आहे.

BBC Modi Documentary Screening
BBC Tax Evasion : बीबीसीचा कांगावा उघड; ४० कोटींचा कर चुकवल्याची दिली कबुली - रिपोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.