Israel-Hamas War: इस्राइल-हमास संघर्ष थांबावा यासाठी अमेरिकेच्या रस्त्यावर जमले शेकडो ज्यू नागरिक; पोलिसांकडून अटक

Israel-Hamas War
Israel-Hamas War
Updated on

तेल अवीव- बुधवारी पॅलेस्टाईनच्या समर्थनात शेकडोच्या संख्येने आंदोलक अमेरिकेत एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. वॉशिंग्टन डीसीच्या यूएस राजधानीमध्ये कैनन रोटुंडा येथे एकत्र जमत इस्त्राइल- हमास यांच्यात सुरु असलेल्या संघर्ष थांबवावा अशी मागणी आंदोलकांनी केली. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, एकत्र आलेल्या लोकांपैकी ३०० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संघर्ष थांबविण्याच्या मागणीवर आंदोलकांनी खूप गोंधळ घातला. तसेच संघर्ष थांबवावा या मागणीसाठी घोषणा दिल्या. जमलेल्या लोकांमध्ये ज्यू संघटनांचे सदस्य देखील होते. त्यांच्या हातात लाल रंगाचे पोस्टर होते, आपल्या सगळ्यांचे रक्त लाल रंगाचे आहे, 'माझे दुःख, तुमचे शस्त्र नाही, असं त्या पोस्टरवर लिहिले होते. त्याचबरोबर आंदोलकांच्या हातात पॅलेस्टाईन देशाचे झेंडे देखील होते.

Israel-Hamas War
Israel Hamas War: इस्राइल हमास युद्धामुळे जगातील सर्वात मोठ्या कंपनीने इस्राइलमधील व्यवसाय बंद केला

तेथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले, आंदोलन सुरु होताच पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वाराऐवजी बोगद्यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. नंतर संसदेच्या कार्यालयाला एक निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात स्पष्ट सांगण्यात आली की संसद परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी एकच दरवाजा खुला ठेवण्यात येणार आहे.

आंदोलनाची माहिती मिळताच संसद भावनांची सुरक्षा वाढवण्यात आली. मंगळवारी रात्री संसद भवनाच्या चारही दिशांना सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात अली होती. हे आंदोलन गाझातील अल- अहली दवाखान्यात झालेल्या स्फोटात ५०० हून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ होते.

Israel-Hamas War
शरद पवारांच्या इस्राइल-पॅलेस्टाईनवरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाल्या...

इस्त्राइल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. व्हाईट हाऊसच्या समोर या आठवड्याच्या सुरुवातीपासून याच विषयावर आंदोलने झाली आहेत. त्यामुळे बहुतांश लोकांना अटक देखील करण्यात आली आहे. हमास आणि इस्राइलमध्ये सुरु झालेला संघर्ष आणखी लाबंण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.