Deltacron : डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या हायब्रीड विषाणूनं वाढवली चिंता

अमेरिकेच्या रुग्णामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉन हे दोन्ही विषाणू आढळल्यानं शास्त्रज्ञ संभ्रमात
Deltacron
DeltacronTeam eSakal
Updated on

कोरोनाती तिसरी लाट जगभरात ओसरताना दिसतेय. तिसऱ्या लाटेमध्ये ज्या वेगानं लोक कोरोना संक्रमित झाले, त्याच वेगानं कोरोना रुग्णांची (Covid19 Cases) आकडेवारी देखील कमी झाल्याचं दिसतंय. मात्र अजूनही चिंता मिटलेली नाही. ओमिक्रॉन (Omicron) नंतर आता आणखी एक नव्या स्ट्रेनबद्दल (New Strain of Covid 19) काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सुरुवातील प्रयोगशाळेतील चूक म्हणून पाहिल्या गेलेल्या डेल्टाक्रॉन स्ट्रेन (Deltacron) सध्या शास्त्रज्ञांची चिंता वाढवलीये. कारण ही चूक नसून, हा नवा व्हेरीअंट असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Hybrid Covid-19 'Deltacron' strain)

Deltacron
रशिया युक्रेन संभाव्य युद्धात

अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका रुग्णामध्ये कोरोनाबाधित रुग्णात डेल्टा आणि ओमिक्रॉन हे दोन्ही विषाणू आढळले. सुरूवातीला याकडे तांत्रिक चुक म्हणून पाहिलं गेलं. मात्र आता ओमिक्रॉन आणि डेल्टाक्रॉनचं मिळून एक नवं संकट आरोग्य व्यवस्थेसमोर उभं राहू शकतं अशी शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या साप्ताहिक रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार हा विषाणू नेमका ब्रिटनमध्ये तयार झाला की, बाहेरून आला याबद्दल स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.

Deltacron
एअर इंडियाची धुरा इल्केर आयजींच्या खांद्यावर; वाचा नव्या CEO बद्दलच्या 10 गोष्टी

दरम्यान, या विषाणूची तीव्रता काय असेल याबद्दल शास्त्रज्ञांना माहिती मिळू शकलेली नाही अशी माहिती 'डेली मेल' या वृत्त संस्थेनं दिली आहे. तरी फार रुग्णांमध्ये अशी लक्षणं आढळली नसल्यानं सध्या शास्त्रज्ञांना मिळाला दिलासा आहे. नेमक्या किती रुग्णांमध्ये हा विषाणू आढळला याचाही उल्लेख अमेरिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये केलेला नाही. ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ञ प्रोफेसर पॉल हंटर यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील नागरिकांमध्ये सध्या डेल्टा आणि ओमिक्रॉन स्ट्रेन विरूद्ध मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती असल्यामुळे फार धोका निर्माण होणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळे सध्या फारशी काळजी वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.