"राजीनामा देणार नाही; शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार"

नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Pakistan PM Imran khan
Pakistan PM Imran khanसकाळ डिजिटल टीम
Updated on

पाकिस्तानमध्ये राजकीय परिस्थिती हलाखीची असून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा सत्तेवरुन पायउतार होणार असल्याचे स्पष्ट चिन्हे दिसत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आता अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला. यात पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाला जोरदार झटका बसलाय. पीटीआयचा मित्रपक्ष कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQMP) ने पीटीआयला पाठींबा दिला नाही. त्यामुळे आता इमरान खान यांचे पंतप्रधान पद धोक्यात आले. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी राजीनामा देत नसल्याचे स्पष्ट केले. (I will not resign, I will play till the last ball. Pak PM Imran Khan said)

Pakistan PM Imran khan
मित्रासोबत लग्न करण्यासाठी तरुणाने केला लिंगबदल; आता मित्रच म्हणतो लग्नाला नाही

देशातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा एकदा त्यांच्या सरकारविरोधात 'परकीय षडयंत्र' असल्याची भीती व्यक्त केली. मी राजीनामा देणार नाही आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Pakistan PM Imran khan
श्रीलंकेत परिस्थिती चिघळली, राजधानी कोलंबोत कर्फ्यू!

राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एका महत्त्वाची बैठक बोलावली. नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी या याचिकेत त्यांच्या सरकारच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय षड्यंत्र’ म्हणून उल्लेख केलाय.

Pakistan PM Imran khan
रशियन सैनिक धुडकावताहेत आदेश

या आधीही काही लोक विदेशी पैशांच्या मदतीने त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. इमरान खान यांनी एका रॅलीमध्ये संबोधताना म्हटले होते की, पाकिस्तानमध्ये सरकार बदलण्यासाठी विदेशी पैसा पुरवला जात आहे. त्यासाठी आमच्या लोकांचा गैरवापर केला जातोय. काही लोक याच विदेशी पैशाचा वापर करु लागले आहेत. असे काही झाले तरी आम्ही राष्ट्रहिताशी कधीच समझोता करणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()